सिव्हील जळीतकांड प्रकरणी चार महिलांना झाली अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हील जळीतकांड प्रकरणी चार महिलांना झाली अटक

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडप्रकरणी पोलिसांनी चार महिलांना मंगळवारी अटक केली. त्यांच्याविरोधात निष्काळजीपणा केल्याचे पुरावे अ

सिव्हील जळीतकांडाचा अहवाल तयार…हलगर्जीपणाचा ठपका?
सिव्हील जळीतकांड तपासासाठी पोलिस बोलावणार एक्सपर्ट टीम ; तपासानंतर कलमांमध्ये होणार वाढ ?
सिव्हील जळीतकांडाच्या तपासात दाखवावा लागला पोलिसी खाक्या

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडप्रकरणी पोलिसांनी चार महिलांना मंगळवारी अटक केली. त्यांच्याविरोधात निष्काळजीपणा केल्याचे पुरावे असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे.
मागील शनिवारी (6 नोव्हेंबर) जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना तपासादरम्यान या चार महिलांविरोधात निष्काळजीपणा केल्याचे पुरावे मिळाल्याने त्यांना आरोपी करुन अटक केल्याचे तपासी अधिकारी उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले. अटक केलेल्यांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांचा समावेश आहे. त्यांना आरोग्य विभागाने सोमवारी निलंबित केलेले आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि चन्ना यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे. या निलंबनाच्या कारवाई विरोधात परिचारिका संघटनेतर्फे मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले होते. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत ती मागे घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आता चार महिलांना अटक झाल्याने संघटनेने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि अन्य एका वैद्यकीय अधिकार्‍याविरुद्ध मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे परिचारिका संघटनेने संताप व्यक्त केला आहे.

COMMENTS