सातारा-लातूर मार्गावर चिखलाचे साम्राज्य

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा-लातूर मार्गावर चिखलाचे साम्राज्य

माण तालुक्यातील उकिर्डे गावातून जाणार्‍या सातारा-लातूर रस्त्याचे काम सुरू आहे. इंदलकर वस्ती नजीक या उखनन केलेल्या ठिकाणी पाणी आणि चिखलाचे साम्राज्य वाढले असून संबंधित मेल कंपनी मात्र दुर्लक्ष करत आहे. चिखलामुळे अपघात ही होत असून याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे वाहन चालकांतून मागणी होत आहे.

सलतेवाडी येथील बेपत्ता युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
Aurangabad :कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वारसांना मदतनिधी देण्याचे काम युद्धपातळीवर | LOKNews24
राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार

गोंदवले / वार्ताहर : माण तालुक्यातील उकिर्डे गावातून जाणार्‍या सातारा-लातूर रस्त्याचे काम सुरू आहे. इंदलकर वस्ती नजीक या उखनन केलेल्या ठिकाणी पाणी आणि चिखलाचे साम्राज्य वाढले असून संबंधित मेल कंपनी मात्र दुर्लक्ष करत आहे. चिखलामुळे अपघात ही होत असून याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे वाहन चालकांतून मागणी होत आहे.

उकिर्डे, ता. माण या ठिकाणी सध्या काम सुरू असून मुख्य रस्त्यापेक्षा सुमारे 15 फूट रस्ता खोल खणून मार्ग करण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी रस्ता मोठ्या भुयाराप्रमाणे वाटत आहे. इथेच पाणी साठून चिखलाचे साम्राज्य वाढले आहे. उकिर्डे गावाच्या नजीक सध्या काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसात पडलेल्या अवकाळी पाऊसाने सर्वत्र पाणी साचून राहिलेले आहे. सध्या पाऊस बंद झाला असूनही या ठिकाणी पाणी साठून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या ठिकाणी येणारे पावसाचे अगदी धबधबा असल्याप्रमाणे दिसत आहे. 

परिसरातून पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने दुचाकी आणि लहान कार अशा वाहनांना या पाण्यातून आणि चिखलातून वाट काढताना खूप जिकिरीच झाले आहे. अंधारात गाडीच्या उजेडात पाणी चिखलाचा अंदाज येत नसल्याने दुचाकी गाडी चालवणे कठीण झाले आहे. इंदलकर वस्ती स्वरूपखानवाडी फाटा येथील लोकांना प्रवास करताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतातून जनावरांना चारा आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. तरी संबंधित कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वाहन चालकांनी सांगितले.

चौकट सातारा-लातूर रस्त्याचे उकिर्डे हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. ते लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. सध्या इंदलकर वस्तीवर राहणार्‍या लोकांना या पाण्याचा व चिखलमय रस्त्याचा खूप त्रास होत असून संबंधित कंपनीच्या सुपरवाझरला याबाबत विचारना केली असता त्यांनी तात्पुरती मलमपट्टी केली. पाऊस सुुरु झाला की परत जैसे थे परिस्थिती होणार आहे. तरी लवकर काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

जितेंद्र कांबळे (पोलीस पाटील, उकिर्डे)  

COMMENTS