Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ; पाच लाखाच्या लाचेचे प्रकरण भोवले

सातारा / प्रतिनिधी : संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी पाच लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सातारा येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश पदावर कार्

सातारा जिल्ह्यातील 1 हजार 323 स्वस्त धान्य दुकानांना आयएसओ मानांकन
सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाच्या कामाची जिल्हाधिकार्‍यांकडून पहाणी
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील

सातारा / प्रतिनिधी : संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी पाच लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सातारा येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश पदावर कार्यरत असलेले धनंजय निकम यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यांना तीन ऑक्टोंबरपासून पदमुक्त होण्यास सांगण्यात आले आहे. उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीकडून त्यांची चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांच्या बडतर्फीचा आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका प्रकरणात संशयितास जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी आधी सत्र न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु दोन्ही न्यायालयांनी त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मात्र, त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते. याप्रकरणी त्यांची उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी करण्यात आली होती. समितीने आपला अहवाल सादर केला होता. त्या अहवालाच्या आधारे निकम यांच्या बडतर्फीचा आदेश काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यादरम्यान, पालघर जिल्ह्यातील वादग्रस्त असेलेले जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे.

COMMENTS