सर्वसामान्यांना झटका… घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ…

Homeताज्या बातम्यादेश

सर्वसामान्यांना झटका… घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ…

प्रतिनिधी : दिल्ली घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महाग झाले आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात बुधवारी 15 रुपयांनी वाढ झाली.  त्यामुळे र

चक्क एकाच बाईकवरून 7 जणांचा प्रवास
जी-20 परिषदेसाठी राजधानीत 3 दिवस लॉकडाऊन
नगर पोलिसांचा डंका…मिटके व देशमुखांना बक्षिसे

प्रतिनिधी : दिल्ली

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महाग झाले आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात बुधवारी 15 रुपयांनी वाढ झाली. 

त्यामुळे राजधानी दिल्लीत गॅस सिलिंडर 899.20 रुपयांवर पोहोचले. याआधी, 1 ऑक्टोबर रोजी 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. 

एकीकडे, पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरू असतानाच आता गॅस दरवाढीस सर्वसामान्यांना सामोेरे जावे लागत आहे. आधीच महागाई वैतागलेल्या नागरिकांना मोठा दणका बसला आहे. 

वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडर तब्बल 205 रुपयांनी महागला आहे. दिल्लीत जानेवारीमध्ये घरगुती सिलिंडर 694 रुपयांना मिळत होता. 

आता 900 रुपयांच्या घरात पोहोचला. पाच किलोचा सिलिंडर 50 रुपयांवर गेला. गेल्या दोन महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडर चौथ्यांदा महागला. 

अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरची किंमत एकसमानच झाली आहे. केंद्र सरकार वर्षभरात 12 सिलिंडरवर अनुदान देते. मात्र, गेल्या काही महिन्यांत हे अनुदान टप्प्या-टप्प्याने कमी करण्यात आले. 

कोलकातामध्ये विनाअनुदानित सिलिंडर 926 रुपये, मुंबईत 899.50 रुपये, चेन्नईमध्ये 915.50 रुपयांवर पोहोचले. याआधी, 1 सप्टेंबर आणि 18 ऑगस्ट रोजी रोजी घरगुती सिलिंडर प्रत्येकी 25 रुपयांनी महागला होता. 

जुलैमध्येही यात वाढ झाली होती. मे आणि जूनमध्ये किंमती स्थिर होत्या. एप्रिलमध्ये 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. 

मार्च महिन्यात 25 रुपये, फेबुवारीत 15 रुपये आणि जानेवारीत 25 रुपयांनी गॅस महागला होता. मुंबईसह अनेक शहरात पेट्रोल 110 रुपयांवर पोहोचले आहे. मध्य प्रदेशातील शिवणी आणि राजस्तानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल देशात सर्वात महागले विकले जाते. अनेक शहरांत डिझेल 98 रुपये दराने मिळत आहे.

COMMENTS