प्रतिनिधी : नाशिक ‘२-३-४ प्रभाग हा कसला खेळ ? उद्या २-२ आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहेत का? ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग नाही,
प्रतिनिधी : नाशिक
‘२-३-४ प्रभाग हा कसला खेळ ? उद्या २-२ आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहेत का? ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग नाही, महापालिकेला प्रभाग का?
यांच्या फायद्यासाठी हे आहे का? आम्ही आमचे मार्ग अवलंबू, पण आता लोकांनी विरोध करावा, कोर्टात जाव, निवडणूक आयोगाकडे जाव.
कुठलाही नगरसेवक काम करू देत नाही, प्रभागामध्ये काम होत नाहीत. उद्या लोकांनी ठरवल नगरसेवकाला भेटायच आहे,
तर कोणत्या नगरसेवकाला भेटायच? यांनी निवडणुकीची थट्टा करुन टाकली आहे. गृहित धरण सुरू आहे त्याविरोधात लोकांनी कोर्टात जाव.
मनपा आणि नप निवडणुकींसाठी सरकारने प्रभागरचना बदलली. या बदलावरून मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सरकारची टिंगल करताना म्हटले की ‘लोकांनी एकाऐवजी तीन- तीन बटणं बोटं का दाबायची. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी!’
‘चार प्रभाग होते, त्याचे तीन का, दोन होते त्याचे चार प्रभाग का, सरकारने नेमका आपला उद्देश काय हे सांगाव. गेल्या दहा वर्षात हा खेळ सुरु आहे. आपण फक्त उघड्या डोळ्याने बघत राहायच का?’ असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
COMMENTS