संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची धुरा भारताच्या हाती

Homeताज्या बातम्यादेश

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची धुरा भारताच्या हाती

पंतप्रधान नरेंद्र मोदी भुषवणार या परिषदेचे अध्यक्षपदनवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद भारत स्वीकारणार असून;

सहकार क्षेत्रातील तरतूदी असंवैधानिक : शरद पवार
उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत- पंतप्रधान
महागाईबद्दल मोदींनी जनतेची माफी मागावी : थोरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी भुषवणार या परिषदेचे अध्यक्षपद
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद भारत स्वीकारणार असून; या महिन्यात सागरी सुरक्षा, शांतता आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन महत्त्वाच्या विषयांवरील कार्यक्रम आयोजित करण्याच्या तयारीत आहे. अर्थात या परिषदेचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार असून ते एक महिन्यासाठी या पदावर असतील. भारताच्या या दबदब्यामुळं पाकिस्तान आणि चीन या शेजारील देशांचं धाबं दणाणलं आहे.
संयुक्त राष्ट्रांतील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा परिषदेत हा आपला आठवा कार्यकाळ आहे. 75 वर्षांहून अधिक वर्षात हे पहिल्यांदाच घडत आहे की, आपल्या राजकीय नेतृत्वानं सुरक्षा परिषदेतील कोणत्याही कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवण्यात रस दाखवला आहे. यावरुन हे दिसून येते की, भारत आणि भारताच्या राजकीय नेतृत्वाने विदेश नीती उपक्रमांमध्ये सक्षमपणे काम केले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, आपण 1 ऑगस्टपासून संयुक्त राष्ट्रांतील सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळणार आहोत. या दरम्यान, भारत अन्य सदस्यांसोबत सहकार्यानं काम करण्यासाठी बांधील आहे. भारत काय संयम, संवाद आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा समर्थक राहिला असून भविष्यातही राहणार आहे. सुरक्षा परिषदेत भारताचा पहिला दिवस सोमवार, दोन ऑगस्ट हा असेल. या काळात भारत तीन प्रमुख क्षेत्रं सागरी संरक्षण, शांतीरक्षा आणि दहशतवाद रोखण्यासंबंधी विशेष कार्यक्रम मांडण्यासाठी सज्ज आहे.

COMMENTS