केज तालुक्यात महागाई कृषी कायदे आणि कामगार कायद्यासह इतर प्रश्नावर आज भारत देश बंद पुकारण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज केज तालुक्यात संयुक्त
केज तालुक्यात महागाई कृषी कायदे आणि कामगार कायद्यासह इतर प्रश्नावर आज भारत देश बंद पुकारण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज केज तालुक्यात संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने लातूर औरंगाबाद हावेवर भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी करत नव्याने पारीत केलेले तीन कृषी कायदे कामगार कायद्यामध्ये बदल केलेला थांबवावा, देशात होत चाललेले खाजगीकरण थांबवावे,
नवीन विज बिल विधेयक रद्द करावे,अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले . या मागणीचे निवेदन केज नायब तहसीलदार यांना दिले असून पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी अनेक पक्षातील पदाधिकारी यांनी या चक्काजाम आंदोलनाला संबोधित केले . शेवटी निवेदनातील मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी बहुजन रयत परिषदचे रमेश तात्या गालफडे. केज संघर्ष समितीचे हनुमंत भोसले , काँग्रेस चे बाळासाहेब ठोंबरेयासह आदि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
COMMENTS