संभाव्य पुराबाबत दोन्ही राज्य समन्वयाने निर्णय घेणार

Homeमहाराष्ट्र

संभाव्य पुराबाबत दोन्ही राज्य समन्वयाने निर्णय घेणार

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात येणार्‍या संभाव्य पुराच्या पार्श्‍वभुमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांची बंगळुरू येथे शनिवारी बैठक पार पडली.

जागृती शुगरच्या संचालकपदी बालाजी बिराजदार यांची निवड
कोतुळमध्ये पोलिस दलाचे पथ संचलन
भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू ः खा. शरद पवार

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्यासोबत बैठक

सांगली / प्रतिनिधी : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात येणार्‍या संभाव्य पुराच्या पार्श्‍वभुमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांची बंगळुरू येथे शनिवारी बैठक पार पडली. यावेळी कोयना धरण आणि अलमट्टी धरणातील पाण्याबाबत समन्वय ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्यासोबत कृष्णा आणि भीमा नदीला येणार्‍या संभाव्य पुराचे कसे नियोजन करायचे याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी दोन्ही राज्याने पुराबाबत समन्वय ठेवण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्राने रियल टाईम डाटा अ‍ॅक्वीजेशन सिस्टीम बसलेली आहे. परंतू कर्नाटकने ती बसवलेली नाही. कर्नाटकने ती बसविल्यास अलमट्टीचे डायनॉमीक लेव्हल कंट्रोल करणे शक्य होईल. त्यामुळे अलमट्टी धरणाच्या येणारा पाण्याची आवक आणि धरणातील विसर्ग, महाराष्ट्रात पडणारा पाऊस यावर डायनॅमिक कंट्रोल ठेवण्यात आल्यास कोठून कितीत पाणी सोडायचे, कोणत्याही धरणात पाण्याची किती फूटापर्यंत लेव्हल ठेवायची. तसेच खासकरून अलमट्टी धरणात किती फूटापर्यंत पाण्याची लेव्हल ठेवायची, त्यातून विसर्ग किती करायचा याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर्षी संभाव्य पूर परिस्थितीवर दोन्ही राज्यांकडून समन्सय ठेवण्यात येईल, असेही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह कर्नाटक पुरपस्थीतीवर समन्वयाने नियंत्रण ठेवणार ..!   

महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील संभाव्य पुरपरस्थितीबाबत समन्वय रहावा यासाठी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यात बेंगलोर येथे आज बैठक झाली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून भविष्यात पूर परस्थितीवर दोन्ही राज्ये समन्वयाने नियंत्रण ठेवतील, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगीतले.             

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पुरपरिस्थिती टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून नियंत्रीत पाणी विसर्ग व्हावा व या काळात दोन्ही राज्यात समन्वय रहावा, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सचिव विजय कुमार गौतम, सहसचिव ए. पी. कोहीरकर, ए. ए. कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधिक्षक अभियंता मिलींद नाईक तर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा गृहमंत्री ना. बोम्मई, मुख्य सचिव राकेश सिंग प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, मुख्य सल्लागार अनिल कुमार, सचिव जलसंपदा लक्ष्मणराव पेशवे, कार्यकारी संचालक मल्लिकार्जुन गुंगे उपस्थित होते.

COMMENTS