श्री विशाल गणेश मंदिर व शनी-मारुती मंदिर महाआरती करुन भाविकांसाठी खुले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री विशाल गणेश मंदिर व शनी-मारुती मंदिर महाआरती करुन भाविकांसाठी खुले

नगर  -  प्रतिनिधी गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्वत्र व्यवहार बंद होते. त्यामुळे शासनाने मंदिरेही भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवले होते. आता द

शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याने धुळे जिल्ह्यातील कॉ. काकुस्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध
दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेली कर्जत तालुक्यातील गावे राहणार ८ दिवसांसाठी बंद
Ahmednagar : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची लोकमंथन कार्यालयास भेट (Video)

नगर  –  प्रतिनिधी

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्वत्र व्यवहार बंद होते. त्यामुळे शासनाने मंदिरेही भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवले होते. आता देवकृपेने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाने मंदिर उघडण्यास परवानगी दिलेली आहे. आजपासून मंदिरे उघडण्यात आली असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. परंतु कोरोना अजुन संपलेला नसल्याने निमय पाळूनच मंदिरात प्रवेश दिली जाणार आहेत. देवस्थान ट्रस्टच्यावतीनेही भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. श्री विशाल गणेशाच्या कृपेने लवकरच आपण कोरोनावर मात करणार आहोत. यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. देवालये ही भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने तेथून सर्वांनाच प्रेरणा मिळत असते. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. भविष्यात असे कोणतेही पुन्हा मानवजातीवर येवू नये हीच, प्रार्थना श्री विशाल गणेश चरणी करत असल्याचे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.

     शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे उद्योजक मोहन मानधना यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, चंद्रकांत फुलारी, गजानन ससाणे, बापूसाहेब एकाडे, हरिश्चंद्र गिरमे, पुजारी संगमनाथ महाराज, पराग मानधना, संत संपर्कप्रमुख अनिल रामदासी, कुणाल भंडारी आदि उपस्थित होते.  यावेळी मानधना परिवाराच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिराच्या कार्यासाठी मदतीचा धनादेश देण्यात आली.

     याप्रसंगी मोहनलाल मानधना म्हणाले, गेल्या वर्षभरापासून मंदिर होते, आज शासनाच्या आदेशाने मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आली आहे ही आनंदाची बाब आहे. मंदिरे बंद असल्याने नित्यनियमांने दर्शन करणार्‍या भाविकांची मोठी अडचण होत होती. आता मंदिर उघडण्यात आल्याने भाविकांना मन:शांती मिळणार आहे. उघडण्यात आलेल्यानंतर आरती करण्याचा मान देवस्थानने आपणास दिल्याने मोठे समाधान मिळाले आहे. भविकांच्या मनोकामना पूर्ण करणारा श्री विशाल गणेश असल्याने मंदिर कार्यासाठी देणगीरुपी सहकार्य देत असल्याचे सांगितले.

     तसेच माळीवाडा येथील शनी मारुती मंदिरात संत संपर्कप्रमुख अनिल रामदासी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दोन्ही मंदिरात सनई-चौघड्याच्या वाद्यावृंदात भाविकांचे स्वागत करण्यात येत होते. याप्रसंगी देवस्थानचे सचिव अशोकराव कानडे यांनी शासनानेच्यावतीने देवस्थानसाठी लागू केलेल्या नियमांची माहिती दिली. शेवटी विजय कोथिंबीरे यांनी आभार मानले.

COMMENTS