श्रीराम बझारमध्ये चोरी; 1 लाख 32 हजाराची रोकड लंपास

Homeमहाराष्ट्रसातारा

श्रीराम बझारमध्ये चोरी; 1 लाख 32 हजाराची रोकड लंपास

फलटण शहरातील महात्मा फुले चौकातील श्रीराम बझारचे मागील बाजूचे शटर उचकटून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने बझारच्या कॅश काऊंटर मधील 1 लाख 32 हजार 266 रुपये चोरून नेहले आहेत.

ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट
लोकप्रिय दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन
शिवसैनिकांपेक्षा उद्धव ठाकरेंना शरद पवार अधिक प्रिय : केसरकर

फलटण / प्रतिनिधी : फलटण शहरातील महात्मा फुले चौकातील श्रीराम बझारचे मागील बाजूचे शटर उचकटून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने बझारच्या कॅश काऊंटर मधील 1 लाख 32 हजार 266 रुपये चोरून नेहले आहेत.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार व तक्रारदार विनायक बाबुराव शिंदे (वय 50, व्यवसाय मॅनेजर रा. सदाशालीन अपार्टमेंट प्लँट नंबर 5 , भडकमकरनगर फलटण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. 17 जून रोजी दुपारी 4.30 ते 18 जून सकाळी 7.30 वा. चे दरम्यान श्रीराम बझार फलटण महात्मा फुले चौक येथील गोडाऊनचे पाठीमागील शटर उचकटुन अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करुन तिजोरीमधील रोख रक्कम व चिल्लर अशी एकूण 1 लाख 32 हजार 266 रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत. तसेच चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी 50 हजार रुपये घटनास्थळी मिळून आले आहेत.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, फलटण शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी भेट देऊन सदर ठिकाणची पहाणी केली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.

COMMENTS