Homeमहाराष्ट्रशहरं

श्रीगोंद्यात 832 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

श्रीगोंदा प्रतिनिधी : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक काल पार पडली. अहमदनगर जिल्ह्यामधील 11189 पुरुष मतदारांनी तर 5138 स्त्री मतदारांनी आ

जामखेड-आष्टी रोडवरील भीषण अपघातात 5 जण ठार
नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड : राम शिंदे
श्रीगोंद्यात नवीन फौजदारी कायदेविषयी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

श्रीगोंदा प्रतिनिधी : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक काल पार पडली. अहमदनगर जिल्ह्यामधील 11189 पुरुष मतदारांनी तर 5138 स्त्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण 93.88% मतदान अहमदनगर जिल्ह्यात झाले. श्रीगोंदा येथील केंद्रामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा हे केंद्र होते. या केंद्रामध्ये एकूण 899 मतदारांपैकी 832 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 92.54 इतकी होती. सर्वच उमेदवारांच्या प्रतिनिधींनी परिसर गजबजुन गेला होता. दिवसभर शांततेत मतदान झाले. एका संस्थेतील संस्थाधिशाने शिक्षकांना रांगेत विद्यार्थ्यांप्रमाणे आणून त्यांच्याकडून मतदान करून घेतले गेले हा चर्चेचा विषय ठरला. प्रशासकीय अधिकारी तहसीलदार वाघमारे आणि प्रांताधिकारी सावंत या ठिकाणी उपस्थित होत्या. तसेच निवडणूक आयोगाचे निरीक्षकही या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लक्ष ठेवून होते. प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS