शैक्षणिक शुल्क 15 टक्क्यांपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत शुल्क भरू नका : अमोल थोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शैक्षणिक शुल्क 15 टक्क्यांपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत शुल्क भरू नका : अमोल थोरात

पुणे : शाळा शुल्क पंधरा टक्के कमी करण्याबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकार उदासीन आहे. या अनास्थेमुळे शैक्षणिक संस्थांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक ह

मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालये केली सील
कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ
माध्यान्ह भोजनात पाल आढळली

पुणे : शाळा शुल्क पंधरा टक्के कमी करण्याबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकार उदासीन आहे. या अनास्थेमुळे शैक्षणिक संस्थांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शिक्षण सम्राट सामान्य पालकांना दाद देत नसून, शैक्षणिक शुल्काच्या नावाखाली मोठी रक्कम उकळण्यात येत आहे, असा आरोप शहर भाजपचे मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी केला आहे.
शैक्षणिक शुल्क 15 टक्क्यांपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत पालकांनी शालेय फी भरू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील शैक्षणिक संस्थाचालक पिळवणूक करत असल्यास पालकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
याबाबत अमोल थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, कोरोना व लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. नोकरदारांचे तर प्रचंड हाल होत आहेत. इतर राज्यांमध्ये ही परिस्थिती लक्षात घेऊन पालकांना दिलासा देण्यासाठी खासगी शाळांचे शुल्क रचनेमध्ये त्यात या सरकारांनी हस्तक्षेप केला. अनेक राज्यांनी याबाबत पुढाकार घेतल्याने महाराष्ट्र सरकारनेही खासगी शाळांचे शुल्क रचनेमध्ये हस्तक्षेप करून पालकांना दिलासा द्यावा. यासाठी पालकांकडून दबाव वाढत आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शैक्षणिक शुल्क 15 टक्के करण्याची घोषणा केली. मात्र ती घोषणा हवेतच विरली.

COMMENTS