अविनाश भाेसलेंशी संबंधित चार काेटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अविनाश भाेसलेंशी संबंधित चार काेटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

पुणे : उद्याेगपती अविनाश भाेसले सध्या सक्त अंमलबजावणी संचनालयाचे (ईडी) रडारवर असून अविनाश भाेसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीशी संबंधित काॅर्पाे

ईडीच्या जरंडेश्वर कारवाईनंतर पुढील नंबर कुणाचा ?
जरंडेश्वरचे भूत कुणाच्या मानगुटीवर बसणार ?
खडसेंना संपविण्यासाठी ईडीची कारवाई : राज ठाकरे

पुणे : उद्याेगपती अविनाश भाेसले सध्या सक्त अंमलबजावणी संचनालयाचे (ईडी) रडारवर असून अविनाश भाेसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीशी संबंधित काॅर्पाेरेट ऑफीसची चार काेटी रुपयांची स्थिर मालमत्ता जप्त केली आहे.
अविनाश भाेसले यांचेवर मनी लाॅड्रिंग प्रकरणी पुणे पाेलीसांकडे तक्रार दाखल असून त्या बाबतचा तपास सध्या ईडी करत आहे. पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील रेंज हिल येथील यशवंत घाडगे नगर काेऑपरेटिव्ह हाैसिंग साेसायटीत प्लाॅट नंबर दाेनवर अविनाश भाेसले यांचे अलिशान काॅर्पारेट ऑफीस आहे. रणजीत माेहिते यांनी संबंधित कार्यालयाची जागा एआरए प्राॅपर्टी यांच्याकडे बेकायदेशीरित्या हस्तांतरित केली. संबंधित जमीन शासकीय असल्याने केवळ शासन व त्याच्याशी संबंधित संस्था यांना हस्तांतरित करण्याचा नियम १९५१ पासून असताना ती बेकायदेशीररित्या हस्तांतरित केली गेली.
ईडीने मनी लाॅड्रिंग प्रकरणाचा तपास करत असताना अविनाश भाेसले यांचे कंपनीशी संबंधित वेगवेगळया ठिकाणी छापेमारी करत महत्वपूर्ण कागदपत्रे आणि पुरावे गाेळा केले आहे. छापेमारीत मिळालेल्या कागदपत्रांचे विश्लेषणावरुन भाेसले यांचे विराेधात एफआयआर दाखल करण्यात आलेली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

COMMENTS