शेतकर्‍यांचे आज रेल रोको आंदोलन

Homeताज्या बातम्यादेश

शेतकर्‍यांचे आज रेल रोको आंदोलन

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक होत असून, आज पुन्हा एकदा शेतकरी संघटना देशभरात रेल रोको आंदोलन करणार आहे.

पुणे लोकसभेची जबाबदारी अमित ठाकरेंवर ?
रेल्वेने पोहचवला 16 हजार मेट्रीक टन ऑक्सिजन
माळढोक संपवण्यामध्ये अजित पवार, बबनराव पाचपुते मुख्य सूत्रधार

नवी दिल्ली – केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक होत असून, आज पुन्हा एकदा शेतकरी संघटना देशभरात रेल रोको आंदोलन करणार आहे. भारतीय किसान युनीयनचे नेते गुरनाम सिंग चढूनी यांनी शेतकर्‍यांना रेल्वे स्थानकांवर जाऊन रेल्वे रोखण्याचे आदेश दिले आहेत. तीन कृषी कायदे रद्द करणे आणि एमएसपीवर पिकांची खरेदी करणे, तसेच लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेत केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक करणे अशा मागण्या घेऊन शेतकर्‍यांनी या आंदोलन पुकारले आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असून, शेतकरी पुन्हा-पुन्हा आक्रमक होतांना दिसून येत आहे. सहनशीलतेची देखील एक सीमा असते, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अशा भावना रोहतकमध्ये आयोजिय किसान महापंचायतीमध्ये गुरनाम सिंग चढुनी यांनी व्यक्त केल्या. उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलक शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. हरियाणाचे मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या विरोधात काठ्या उगारायला सांगतात आणि लखीमपूरमध्ये ही घटना होते, हा योगायोग नाही असेही यावेळी चढुनी यावेळी म्हणाले. दरम्यान, शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला आता वर्षभरापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवर सर्वोच्च न्यायालयाने तुर्तास स्थगिती आणलेली आहे. मात्र हे कायदे रद्द करा ही मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून उद्या रेल रोको आंदोलन केले जाणार आहे.

COMMENTS