शिवसेना भवनसमोर शिवसैनिक – भाजपच्या कार्यतर्त्यांचा जोरदार राडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना भवनसमोर शिवसैनिक – भाजपच्या कार्यतर्त्यांचा जोरदार राडा

अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेने टीका केल्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाने त्याचा निषेध करत दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला.

प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आयकरसंदर्भात मोठी घोषणा
जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेने टीका केल्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाने त्याचा निषेध करत दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. यावेळी मोर्चाला जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमले. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. 

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजपा जनता युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे. “भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनमध्ये जमले होते. भाजपाचे काही कार्यकर्ते दगडफेक करणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. यामुळे शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली,” अशी माहिती स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे.

COMMENTS