बुलडाणा : सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
बुलडाणा :
सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
खोत यांनी मिश्किल शब्दांत सरकारवर टीका-टिप्पणी केली आहे. “राज्यातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला होता.
नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकून सत्तादेखील दिली होती. मात्र, लग्न ठरावे, साखरपुडा व्हावा, हळद लागावी आणि अक्षदा पडण्याच्या वेळेतच नवरीने मंडप सोडून पळून जावे, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली.
नवरी पळून गेली आणि आमचा मंडप ओस पडला. मात्र, अजूनही आम्ही मंडप मोडलेला नाही, मंडप सजवून ठेवला आहे. त्यामुळे योग्यवेळी बँड लावून आम्ही अक्षदा टाकू.” असे सूचक विधान सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्रित आलेले तिघेही हे दरोडेखोर आहेत. टी-ट्वेंटी सारखे कमी वेळात जेवढे जास्त शासनाची तिजोरी कशी लुटता येईल, याचा सपाटा त्यांनी लावला आहे.
या तिघांचाही द्रोणाचार्य म्हणजे, शरद पवार हे बाजूला बसलेले आहेत. शरद पवार यांना द्रोणाचार्य म्हणणे म्हणजे द्रोणाचाऱ्याचा अपमान आहे,
असे वक्तव्य माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे. यावेळी ते विदर्भातील बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बोलत होते.
COMMENTS