मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’… सनरायझर्स हैदराबाद सोबत आज लढत

Homeताज्या बातम्यादेश

मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’… सनरायझर्स हैदराबाद सोबत आज लढत

वेब टीम : मुंबई मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करावी लागेल आणि 200 पेक्षा जास्त धावांचा डोंग

चिंचोली कुस्ती मैदानात दत्ता बानकर नंबर वन; मैदानात मल्लविद्या केंद्र शेडगेवाडीच्या मल्लाचे वर्चस्व
सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्या
नागाचे कुमठे कुस्ती मैदानात सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरी बालारफिक शेखला पाच मिनिटात दाखविले अस्मान

वेब टीम : मुंबई

मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करावी लागेल आणि 200 पेक्षा जास्त धावांचा डोंगर तयार करावा लागेल आणि नंतर हैदराबादला 170 पेक्षा जास्त धावांनी पराभूत करावे लागेल. तरच ती कोलकाताच्या नेट रन रेटच्या पुढे पोहोचू शकेल.

पण हे मुंबईसाठीही सोपे नाही, कारण जर हैदराबाद संघाने शुक्रवारी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर मुंबईचे स्वप्न तिथेच संपेल आणि कोलकाता आपोआप प्लेऑफसाठी पात्र होईल. 

हे सर्व गणित खूप कठीण दिसते आहे, त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफमध्ये पोहोचणार हे निश्चित मानले जाते. असे झाल्यास दिल्ली-चेन्नई आणि बंगळुरू-कोलकाता प्लेऑफमध्ये दिसतील.

इंडियन प्रीमियर लीग 2021(iPL 2021) आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे आणि सर्वांच्या नजरा प्लेऑफवर (Playoff) आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मोठ्या फरकाने पराभव केला, 

त्यानंतर प्लेऑफमध्ये चौथ्या संघासाठी शिल्लक असलेल्या जागेसाठीची लढाई अतिशय रोचक बनली आहे. आता शुक्रवारी होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील सामन्याच्या निकालाची वाट पाहावी लागेल.

राजस्थान रॉयल्सचा कोलकात्याकडून पराभव झाल्यामुळे कोलकाताचा नेट रन रेट लक्षणीय वाढला आहे. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र झाले आहेत 

आणि आता ते चौथ्या स्थानासाठी लढत आहेत. कोलकाताच्या संघाला आता 14 गुण मिळाले आहेत आणि प्लेऑफमध्ये पोहोचणे पूर्णपणे निश्चित मानले जाते. पण त्यात एक समस्या आहे.

कोलकाता व्यतिरिक्त, प्लेऑफच्या शर्यतीत आता जिवंत असलेला दुसरा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. कारण त्याचा शेवटचा सामना शुक्रवारी खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत जर मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल, 

तर त्यांना हैदराबादला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल जेणेकरून विजयानंतर त्यांचा नेट रन रेट कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा चांगला असेल. त्यानंतरच प्लेऑफमध्ये पोहोचणे अंतिम होईल.

COMMENTS