शरद पवारांच्या सर्वात निकटवर्तीय मित्राचे निधन… घरी भेट देत वाहिली श्रद्धांजली (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांच्या सर्वात निकटवर्तीय मित्राचे निधन… घरी भेट देत वाहिली श्रद्धांजली (Video)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार  यांचे सर्वात निकटवर्ती मित्र जगन्नाथ अप्पा मोरे यांचे काल दि ६ रोजी दुःखद निधन झाले होते. जगन्ना

पक्षांच्या समर्थन-विरोधात जनता नाही ! 
गडचिरोलीत धावत्या बसने पेट घेतला
कोकमठाणमध्ये ज्ञानेश्‍वरी पारायण, कीर्तन महोत्सव

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार  यांचे सर्वात निकटवर्ती मित्र जगन्नाथ अप्पा मोरे यांचे काल दि ६ रोजी दुःखद निधन झाले होते. जगन्नाथ आप्पा व शरद पवार यांची मैत्री सर्वांना परिचित असून या आपल्या जवळच्या मित्राला श्रद्धांजली वाहण्यात करीता व मोरे कुटुंबाचे सांत्वन करण्याकरिता आज  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे इंदापूर दौऱ्यावर आले होते

इंदापूर पंचायत समितीचे पहिले सभापती जगन्नाथराव मोरे यांच्या निमगाव केतकी येथील व बाबासाहेब पाटील यांच्या लासुर्णे येथील निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दोन्ही कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन सात्वंन केले .यावेळी राष्ट्रवादी काग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जमा अप्पांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला .जगन्नाथराव मोरे व शरद पवार यांची ४६ वर्षांची मैत्री होती .शरद पवार यांनी जमा आप्पा यांच्या आजारपणा विषयी संपूर्ण माहिती घेतली.  मोरे कुटुंबांना दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो असे मत त्यांनी व्यक्त केले

COMMENTS