Homeताज्या बातम्यासंपादकीय

शब्दांचे भान नसले की……!

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बोलताना आपल्या भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांना काँग्रेसने कसं डावललं

प्रतिगामी उदयनराजे आणि पुरोगामी फडणवीस !
समीर वानखेडेवर प्रश्नचिन्ह म्हणजे संविधान आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह (Video)
प्रा. हाके यांच्यावर झुंडशाहीचा हल्ला गंभीर!

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बोलताना आपल्या भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांना काँग्रेसने कसं डावललं, ही भूमिका मांडत असताना, त्यापूर्वी, त्यांनी ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला, ती बाब देशभरात वादग्रस्त ठरली आहे. आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन झाली आहे, आणि संसदेमध्ये आता केवळ आंबेडकर-आंबेडकर केलं जातं; एवढ्या मोठ्या संख्येने जर देवाचं नाव घेतलं असतं तर, प्रत्यक्षात देव भेटला असता; अशा प्रकारची ही उपरोधिक त्यांची वाक्य,  संपूर्ण देशाला झोंबणारी आहे. अर्थात, यावर विरोधी पक्षाने तात्काळ प्रतिक्रिया ही दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आता देशाच्या एकूणच सामाजिक स्थित्यंतराचे प्रतीक बनले आहेत. सध्याची सत्ताधारी असणारी भाजप आणि आघाडी यांना देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पुढे जाता येत नाही. विरोधी पक्ष असणाऱ्यांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय राजकीय सत्तेत परत येण्यासाठी, विरोधकांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय गत्यंतर नाही! महात्मा गांधी या देशात राष्ट्रपिता ठरले; परंतु, एकूणच देशाच्या उत्थानासाठी आता ज्या विचारांची खरी गरज आहे, तो विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून सुरू होतो. तो त्यांच्याजवळच येवून थांबतो. देशाची ही परिस्थिती पाहता, गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये ज्या पद्धतीने सुरुवातीला उल्लेख केला, तो उल्लेख पाहता त्यावर आता आक्षेप आहे. यावर ऍड. प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली.  ते म्हणतात की, ” त्यांना म्हणजे, सध्याच्या सत्ताधाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी नेमकं काय म्हणायचं आहे, हेच त्यांच्या ओठात आल्याची  टीका ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अर्थात अमित शहा यांचे संपूर्ण भाषण हे वेगळ्या पद्धतीने पेश झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी काँग्रेसने कशी दगाबाजी केली, हे त्यांनी आपल्या भाषणाच्या एकूण ओघात सांगितलं; परंतु, ज्या पद्धतीने त्यांनी वाक्य वापरलं, ते वाक्य त्यांनी मुद्दाम म्हणून वापरलं की, त्यांच्या भाषणासाठी तसे लिखित दिलं गेलं, नेमकं काय या संदर्भात संभ्रम असला तरी, अमित शहा यांनी ते जाणीवपूर्वक वापरलं असावं, असा एक संशय देशामध्ये बळावला. त्यामुळे या वक्तव्याविरोधात निश्चितपणे देशभरात आंदोलन होईल! कारण, सध्या देशाने जो विचार केलेला आहे, त्यामध्ये सत्ताधारी असो अथवा विरोधक असो, दोघांनाही देशाच्या उत्थानासाठी विचार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आधुनिक विचार स्वीकारावेच लागतील.  ते विचार स्वीकारल्याशिवाय, त्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय, देशाला पुढे जाता येणार नाही; ही आता काळया दगडावरची रेष असल्यामुळे या संदर्भात देशात आता मोठ्या प्रमाणात मंथन होत आहे. कधीकाळी सत्ताधारी आणि विरोधक हे नाव घेत नसले तरी, प्रत्यक्षपणे त्यांना त्या विचारांची अंमलबजावणी करणे भाग पडत होती. परंतु, आता उघडपणे ही सगळी अंमलबजावणी करावीच लागते/ करावीच लागेल. हे आता देशाच्या लक्षात आल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या विषयी वैचारिक जुगलबंदी आता सुरू झाली. पण, ही जुगलबंदी करत असताना त्यात शब्द मर्यादांचे पालन आवश्यक आहे. त्या मर्यादा अनावधानाने असतील किंवा मुद्दामपणे असतील; परंतु, त्या पाळल्या गेल्या नाहीत आणि हाच आता टिकेचा आणि वादाचा विषय झालेला आहे.

COMMENTS