शक्ती कायदा हिवाळी अधिवेनशनात होणार संमत :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शक्ती कायदा हिवाळी अधिवेनशनात होणार संमत :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून, या घटना रोखण्यासाठी राज्य सरकार शक्ती कायदा लवकरच संमत करण्याची शक्यता

अमरधाममधील कामगारांना मनपाच्या सेवेत नोकरी द्या
गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला मिळणार 300 व्हेंटिलेटर्स
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाचे शांतीदूत : आमदार डॉ.सुधीर तांबे

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून, या घटना रोखण्यासाठी राज्य सरकार शक्ती कायदा लवकरच संमत करण्याची शक्यता आहे. शक्ती विधेयक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्याचे संकेत खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
महिला अत्याचारासंबंधित शक्ती कायदा विधेयक नागपूर अधिवेशनात संमत करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्यासाठी संयुक्त निवड समितीच्या अहवालावर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. अमली पदार्थाच्या विळख्यात सापडून तरुणाई उध्वस्त होऊ शकते. हे ध्यानात घेऊन पोलिसांनी आता नक्षलवाद आणि दहशतवादा इतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करी लक्ष द्यावे, असा सल्ला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पोलीस दलाला दिला. नागपुरातील पोलीस निवासस्थानाच्या नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून वनामतीच्या सभागृहात ते बोलत होते.सध्या अंमली पदार्थाचा विषय सर्वत्र चर्चेत आहे. त्याला स्पर्श करताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी अंमली पदार्थ आणि दुष्परिणामाचे सांकेतिक विश्‍लेषण केले. दहशतवाद आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागणार असल्याचे वळसे-पाटील म्हणाले. त्यासाठी शाळा महाविद्यालयाच्या अवती-भवतीही पोलिसांना नजर रोखावी लागेल, असे ते म्हणाले. पोलिसांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. प्रत्येक पोलिसाच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून पोलिसांचे संख्याबळ वाढवण्यासाठी 12 हजार पोलिसांच्या भरतीचे उद्दीष्ट सरकार समोर असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलीस दलात भरती होणारा शिपाई उपनिरीक्षक म्हणूनच रिटायर्ड होईल, असेही त्यांनी सांगितले.

आदरयुक्त दरारा निर्माण करा
पोलिस ठाण्यात येणार्‍या प्रत्येकाला आदराची आणि न्यायाची वागणूक मिळाली पाहिजे. याचबरोबर तुमचा आदरयुक्त दरारा निर्माण करा, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांना केले. कायदा आणि सुव्यवस्थेची घडी राखण्यासाठी तुम्ही तुमचे दक्ष पण एक काम करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सूचक वक्तव्य ही त्यांनी यावेळी केले.

COMMENTS