Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विहिरीत पडलेल्या गव्याला वनविभागाकडून जिवदान

अथक परिश्रमाने जेसीबीच्या साह्याने काढले बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास यशपाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील मौजे मारुल तर्फ पाटण येथे ल

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 10 दिवसांत काढण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
गोंदवले येथील फर्निचरच्या शोरुमला भीषण आग; लाखोचे नुकसान; चारजण जखमी
महिला धोरणाच्या मसुद्यावर अधिवेशनात चर्चा व्हावी : ना. रामराजे नाईक-निंबाळकर

अथक परिश्रमाने जेसीबीच्या साह्याने काढले बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास यश
पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील मौजे मारुल तर्फ पाटण येथे लक्ष्मण चौधरी यांच्या मालकीच्या विहिरीत गवा पडल्याचे वन विभागाला समजल्यानंतर सातारा सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुरणे सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले परिक्षेत्र वन अधिकारी एल. व्ही. पोतदार पाटण वनपाल वाय. एस. सावर्डेकर हेळवाक, वनपाल संतोष यादव, वनमजूर पाटण संजय जाधव, वनमजुर पाचगणी यशवंत बनसोडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतील गव्याची पाहणी केली.
वन अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यासाठी तात्काळ हालचाली सुरू केल्या गव्याला बाहेर काढण्याच्या दृष्टीने तात्काळ जेसीबीच्या साह्याने विहिरीचा काठ खोदून तात्पुरता रेंप तयार करण्यात आला. त्या रॅम्पवरून या गाव्याला विहिरीतून बाहेर येण्यासाठी जागा करून देण्यात आली. गवा सुखरूप बाहेर आल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुरणे सुधिर सोनावले पोतदार वनपाल वाय. एस. सावर्डेकर, संतोष यादव, वनमजूर संजय जाधव, यशवंत बनसोडे यांनी ही यशस्वी कामगिरी केली
मारुल : विहीरीत पडलेला गवा. (छाया : संजय कांबळे)

COMMENTS