विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी समितीने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा – उदय सामंत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी समितीने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा – उदय सामंत

कोरोनाचा पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्क संदर्भात विद्यार्थी,पालक संघटनाकडून शासनाकडे निवेदन प्राप्त झाली आहेत.

कृषि विद्यापीठाच्या क्षारपड जमीन क्षारमुक्त
संगमनेर शहरासाठी इंटरचेंज ठेवा : आमदार तांबे
अखेर राजद्रोहाचं कलम तात्पुरते स्थगित

 मुंबई : कोरोनाचा पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्क संदर्भात विद्यार्थी,पालक संघटनाकडून शासनाकडे निवेदन प्राप्त झाली आहेत. यासंदर्भात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी समितीने प्राप्त निवेदनावर अभ्यास करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा आशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. 

    आज मंत्रालयात महाराष्ट्र विना अनुदानीत खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन ) अधिनियम -2015 नुसार गठीत केलेल्या समितीची पहिली बैठक आज झाली. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधिश विजय लखीचंद आचलिया, राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी, समितीचे सदस्य सनदी लेखापाल मनोज चांडक, परिव्यय लेखापाल रत्नाकर फडतरे, व्यवसायिक शिक्षण तज्ज्ञ धर्मेंद्र मिश्रा, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS