विक्रमी ऊस उत्पादन देणारे सर्व वाण राहुरी कृषि विद्यापीठाचे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विक्रमी ऊस उत्पादन देणारे सर्व वाण राहुरी कृषि विद्यापीठाचे

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी  सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन वाढीच

समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू
भागवतराव शिंदे यांचे निधन
LokNews24 l ‘टीव्हीपेक्षा तेज’ सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना अटक

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन वाढीच्या कार्यक्रमास गती मिळावी व शेतकर्यांमध्ये उच्चांकी उत्पादन घेण्यासाठी निकोप स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी हंगामनिहाय एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेणार्या शेतकर्यांचा सहकुटुंब गौरव केला जातो. सन 2020-21 या कालावधीत ऊस पुरवठा केलेल्या पुरस्कार प्राप्त शेतकर्यांचा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणुन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सदस्य तथा क्रांती उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख आ. श्री. अरुण (अण्णा) लाड, भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबईचे माजी शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. श्री. शरद काळे उपस्थित होते. 

यावेळी झालेल्या कार्यक्रमात सन 2020-21 या गळीत हंगामात हंगामनिहाय कारखाना कार्यक्षेत्रातील प्रति एकरी जास्त ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकर्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये आडसाली हंगामात को-86032 वाणाचे श्री. प्रकाश चव्हाण (तांदळगाव) यांनी प्रति एकरी 113 मे. टन, श्री. भगवान होनमाने (देवराष्ट्रे) यांनी 111 मे. टन आणि श्री. केदारी कदम (शेळकबाव) यांनी 104 मे. टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. पुर्व हंगामात  श्री. मोहन जगदाळे (आंधळी) यांनी फुले 10001 या वाणाचे प्रति एकरी 93 मे. टन, श्री. नानासो चव्हाण (तांदळगांव) यांनी 87 मे. टन आणि श्री. राजाराम पाटील (बोरगांव) यांनी को-86032 या वाणाचे प्रति एकरी 81 मे. टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. 

सुरु हंगामात श्री. कृष्णा भोसले (बांबवडे) यांनी को-86032 या वाणाचे प्रति एकरी 76 मे. टन, श्री. प्रशांत चौगुले (भिलवडी) यांनी फुले 10001 या वाणाचे प्रति एकरी 62 मे. टन आणि श्री. भिकू जाधव (हिंगणगांव) यांनी फुले 0265 या वाणाचे प्रति एकरी 61 मे. टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. खोडवा हंगामात को-86032 वाणाचे श्री. आप्पासाहेब जाधव (आसद) यांनी प्रति एकरी 71 मे. टन, श्री. अमर जाधव (कुंभारगांव) यांनी 69 मे. टन आणि श्री. मारुती माळी (कुंडल) यांनी 66 मे. टन इतके उत्पादन घेतले आहे. अशा प्रकारे महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ऊस वाणांचे शेतकर्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. या निमित्त शेतकर्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गौरविण्यात आले. 

शेतकर्यांना शेती करतांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. सध्या हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेती आणि शेतकर्यांना बसत आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीतही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि मोठ्या कष्टाने ऊस वाणांचे विक्रमी उत्पादन घेवून पुरस्काराला पात्र ठरलेले शेतकरी खरोखरच कौतुकास पात्र आहेत. या सर्व शेतकर्यांनी राहुरी कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने तयार केलेल्या उसाच्या वाणांची निवड केलेली आहे. यामुळे पर्यायाने सर्वोत्कृष्ट ऊस वाण तयार करणारे पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचाही गौरव झाला आहे असे मी समजतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. उमेश जोशी, कार्यकारी संचालक श्री. चंद्रकांत गव्हाणे तसेच शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS