वाळकी येथे भरदिवसा डोक्यात दगड घालून 35 वर्षीय तरुणाचा खून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळकी येथे भरदिवसा डोक्यात दगड घालून 35 वर्षीय तरुणाचा खून

अहमदनगर/प्रतिनिधी - नगर तालुक्यात वाळकी येथे दोन शेजा-यांमध्ये सायकल लावण्याच्या किरकोळ  कारणातून वाद झाले. या वादात जावेद गनीभाई तांबोळी वय 35&

मनपात आता 67 विरुद्ध0 …विरोधक कोणी देता का?
श्रीराम कथा व अखंड हरीनाम सप्ताह रायतळेत उत्साहात
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात धडकला मोर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी – नगर तालुक्यात वाळकी येथे दोन शेजा-यांमध्ये सायकल लावण्याच्या किरकोळ  कारणातून वाद झाले. या वादात जावेद गनीभाई तांबोळी वय 35  या तरुणाच्या डोक्यात दगड घालून व धारदार शस्त्राने मारून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना नगर तालुक्यातील वाळकी येथील स्टेट बँके समोर चौकात घडली. वाळकी येथे शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात सायकल लावण्याच्या कारणावरुन वाद झाले.या वादाच्या रागातून वाळकी येथील भांड्याचे व्यापारी गनीभाई तांबोळी यांचा मुलगा जावेद वय 35 याला धारदार शस्त्राने व डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला. या घटनेने वाळकी हादरली असून काही काळ तणाव निर्माण झाला.या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानी मृतदेह शवविच्छेनाकरीता पाठवला.

COMMENTS