वाण नदीपात्रात बुडून बालकाचा मृत्यू; सोनपेठात दुर्दैवी घटना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाण नदीपात्रात बुडून बालकाचा मृत्यू; सोनपेठात दुर्दैवी घटना

सोनपेठ - प्रतिनिधी  सोनपेठ शहरातून वाहणाऱ्या वाण नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या एका बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.&nb

ऐसाम शिलेदारची बास्केटबॉल तपश्‍चर्या कौतुकास्पद – पो.नि. डोईफोडे
अमोल मिटकरी हे लोकांना भुलवून आपल्या सत्तेची पोळी शेकवतात
Wardha : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन | LokNews24

सोनपेठ – प्रतिनिधी 

सोनपेठ शहरातून वाहणाऱ्या वाण नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या एका बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

सोनपेठ शहरातील फुकटपुरा वडकर गल्ली भागात राहणाऱ्या शेख रेहान शेख आलीम (वय१२वर्षे) हा आपल्या मित्रांसोबत दि. ५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाण नदीच्या पात्रात पोहायला गेला होता. आज नदी पात्रात अचानक सकाळपासून पाणी वाढले होते. 

त्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात शेख रेहान हा वाहून गेला. नदीकाठी धुणे धुण्यासाठी  आलेल्या काही महिलांनी मुलगा वाहून जात असल्याचे पाहून मदतीसाठी परिसरातील नागरिकांना बोलावले. मुलगा वाहून गेल्याचे समजताच परिसरातील असंख्य तरुण नदी पात्राशेजारी गोळा झाले होते. तसेच काही तरुणांनी त्याचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरून प्रयत्न केले. 

तब्बल एक ते दीड तासानंतर रेहानचा मृतदेह हा नदीपात्रातील एका बाभळीच्या वनात सापडला. यावेळी सोनपेठ पोलीस ठाण्याचे जमादार कुंडलीक वंजारे, वचीष्ठ भिसे, तलाठी चिकटे, नायब तहसीलदार गायकवाड तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख कृष्णा पिंगळे, शुभम सोन्नर, आनंद गुजराथी, गणेश जोशी, काँग्रेसचे सुमित पवार, राजू सौदागर, नगरसेवक उस्मान कुरेशी, दिगंबर भाडूळे, रमाकांत राठोड, कल्पेश राठोड, खाजा कुरेशी, सिद्दीक कुरेशी आदी असंख्य तरुणांनी मदत केली. 

रेहान शेख याचे सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे देण्यात आला. सोनपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अतिशय गरीब कुटुंबातील रेहान शेख याच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली.

COMMENTS