वाटेफळला पकडले पावणेदोन कोटीचे बायोडिझेल ; सोळाजणांविरुद्ध गुन्हा दाखल, 11जण जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाटेफळला पकडले पावणेदोन कोटीचे बायोडिझेल ; सोळाजणांविरुद्ध गुन्हा दाखल, 11जण जेरबंद

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यामध्ये बायोडिझेलच्यासंदर्भामध्ये धडक कारवाई मोहीम पोलिसांची सध्या सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने न

अरे बापरे…जिल्ह्यात एकाच दिवसात 224 मृत्यू ;मृत्यू तांडवाने नगर जिल्ह्यात खळबळ, आकडे चुकल्याचा संशय
क्रिकेट सट्टयात गमावलेले पैसे चुकविण्यासाठी दागिन्यांची चोरी
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यामध्ये बायोडिझेलच्यासंदर्भामध्ये धडक कारवाई मोहीम पोलिसांची सध्या सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नगर तालुक्यातील वाटेफळ येथे छापा टाकून सुमारे 1 कोटी 75 लाख रुपयांचे बायोडिझेल हस्तगत करून सोळा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी अकरा आरोपींना यामध्ये ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तीन टँकर, 2 ट्रक, 3 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर ते सोलापूर रोडवर वाटेफळ शिवारातील हॉटेल स्वप्निलमागे आडोशाला ही कारवाई पोलिसांनी केली. यात अविनाश पोपटराव नाटक (वय 29 वर्षे, रा. दूधसागर सोसायटी, केडगांव, ता. जि. अहमदनगर), बंडू बाळासाहेब जगदाळे (वय 36 वर्ष, रा. रूईछत्तीशी, ता. जि. नगर), विजय अशोक वाडेकर (वय 31 वर्षे, रा.मंगलगेट कोठला, ता. जि. नगर), योगेश भगवान गंगेकर (वय 42 वर्ष, रा. वाटेफळ ता. जि. नगर), चंद्रकांत शेखर सोनोणे (वय 35 वर्ष, रा. रुईछत्तीशी ता. जि. नगर), मुजमील राजू पठाण (वय 23 वर्षे, रा. सातपुते गल्ली, केडगांव, ता. जि. नगर), सचिन दशरथ लामखडे (वय 23 वर्ष, रा. कातळवेढा, ता. पारनेर, जि.नगर), कंटेनरवरील ड्रायव्हर अरुण माधयन (वय 34 वर्षे, रा. तासम नायकूमपट्टी, वमन्नूर सेलम, राज्य तामिळनाडू-ट्रक ड्रायव्हर), वेडीआप्पा गंगा दूरई (वय 24 वर्षे, रा.तांडरामपट्ट तृणामलाई, राज्य तामिळनाडू- ट्रक ड्रायव्हर), बाबासाहेब सखाराम बोरकर (वय 45 वर्षे, रा. भोयरे पठार, ता. नगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ट्रेलर टँकर नं.एमएच-46 एआर-2477, टँकर नं. एमएच 10-4724, टँकर नं. एमएच 12 सीटी 0619, ट्रक क्रमांक टीएन-52 जे-7288, ट्रक क्रमांक टीएन-52 एच. 7485, इलेक्ट्रीक मोटार 44 हजार रुपयांची व बायोडिझेल, 2 कार, एक बोलेरो, सहा मोबाईल तसेच 1 लाख 44 हजार रुपये रोख असा एकूण 1 कोटी 75 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पकडलेल्या आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, संजय अशोक साबळे(रा. नील हॉटेल, केडगाव बायपास) याच्या व त्याच्या साथीदारांच्या सांगण्यावरून बायो डिझेलची विक्री करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी बायोडिझेल इंधनाचा साठा व विक्री करण्यास निर्बंध असताना अवैधरित्या साठा करून व बेकायदेशिररित्या बाळगून विक्री केल्या प्रकरणी भादवि कलम 285, 34 सह जीवनावश्यक कायदा कलम 3, 7 सह विस्फोटक कायदा 1908 चे कलम 3, 4 (ब), 6 व त्याअंतर्गत नियम पेट्रोलियम कायदा 1934 चे कलम 23, पोट कलम 1 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, हवालदार दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, विष्णु घोडेचोर, दिनेश मोरे, भाऊसाहेब काळे, पोलिस नाईक लक्ष्मण खोकले, संदीप दरंदले, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, संतोष लोढे, सचिन अडवल, मच्छिन्द्र बड़े, योगेश सातपुते, रोहित येमूल, सागर ससाणे, मयूर गायकवाड, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, रविन्द्र घुंगासे, जयराम जंगले, अर्जुन बढे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. नगर जिल्ह्यामध्ये बायोडिझेलच्या संदर्भामध्ये गेल्या महिन्याभरापासून पुरवठा विभाग व पोलिस विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतलेले आहे याच अनुषंगाने नगर तालुक्यातील वाटेफळ येथे बायोडिझेलची सर्रासपणे विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून अशाच प्रकारची बायोडिझेलची विक्री होत असल्याचे तपासामध्ये पुढे आलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी यांनी अशा प्रकारची विक्री केलेली आहे, त्याची सुद्धा माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. नगर तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची पहिलीच कारवाई झाली आहे.

COMMENTS