वसुलीचा अ‍ॅक्शन प्लॅन दिल्याने निवडणूक संधी…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसुलीचा अ‍ॅक्शन प्लॅन दिल्याने निवडणूक संधी…

अहमदनगर/प्रतिनिधी- बँक बचाव समितीने रिझर्व्ह बँकेला टॉप 100 कर्जखात्यांच्या वसुलीचा अ‍ॅक्शन प्लॅन दिला असून, बँक बचाव समितीचा वसुली करण्याचा आत्मविश्

शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश
नगर अर्बन बँकेची ठप्प वसुली खंडपीठात ;सहकार आयुक्तांसह पोलिस अधीक्षकांना नोटीस
नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक यांनी केली आत्महत्या

अहमदनगर/प्रतिनिधी- बँक बचाव समितीने रिझर्व्ह बँकेला टॉप 100 कर्जखात्यांच्या वसुलीचा अ‍ॅक्शन प्लॅन दिला असून, बँक बचाव समितीचा वसुली करण्याचा आत्मविश्‍वास व बँक वाचविण्याची प्रामाणिक तळमळ पाहून तसेच शक्यता व परिस्थितीचे अवलोकन करून रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँक बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला व केन्द्रीय निबंधक कार्यालयाकडून आखण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमास हिरवा कंदील दिला, असा दावा बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी बुधवारी केला. प्रशासक कार्यकाळात प्रभावी वसुली झारीतील शुक्राचार्यांनी होवू दिली नाही. ती वसुली बँकेच्या निवडणुकीत निष्कलंक व प्रामाणिक हेतू असलेले संचालक निवडून आले तर नक्की होवू शकते, असा विश्‍वास रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांना वाटला असावा, असेही मत त्यांनी मांडले.
नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. मागील मंगळवारपासून (26 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलच्या सहाजणांसमवेत अन्य पाचजणांनी उमेदवारी दाखल केली. बुधवारी (27 ऑक्टोबर) दुसर्‍या दिवशी संजयकुमार भळगट यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. आता निवडणूक रिंगणात 12 उमेदवार झाले आहेत. बँक बचाव कृती समितीच्या उमेदवारांचे तसेच सहकार पॅनेलच्या अन्य उमेदवारांचे अर्ज गुरुवारी (28 ऑक्टोबर) गुरुपुष्यांमृत मुहूर्तावर दाखल होण्याची शक्यता आहे. मंगळवारी 24जणांनी 104 अर्ज नेले होते तर, बुधवारी 27जणांनी 127 कोरे अर्ज नेले आहेत. यापैकी कितीजण उमेदवारी दाखल करतात, याची उत्सुकता आहे.

तीन चमत्कारांचा दावा
बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी तीन चमत्कारांमुळे नगर अर्बन बँक वाचण्याच्या मोहिमेस गती मिळाल्याचा दावा केला. मागील तीन वर्षांच्या घटनांचा आढावा घेतला तर काही आश्‍चर्यजनक चमत्कार घडल्याचे स्पष्ट होते. हे चमत्कार पाहता ही वैभवशाली बँक वाचावी अशी कोणतीतरी ईश्‍वरी वा दैवी शक्तीची इच्छा असावी, असा दावा करून ते म्हणाले, 12 ऑक्टोबर 2018 रोजी बँकेत तब्बल 48 वर्षे विविध पदांवर काम केलेले (स्व.) सुवालाल गुंदेचा (वय 85 वर्ष) यांची प्रकृती खूप खालावलेली होती व त्यांना बोलण्यास त्रास होत होता. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली व तत्कालीन सत्ताधार्‍यांच्या चुकीच्या कारभाराचा पर्दाफाश केल्याने चुकीचे कर्जवाटप थांबून बँकेचे 36 कोटी रुपये व बँकही वाचली. त्यानंतर चार दिवसांनी सुवालालजींचे निधन झाले. पण त्यांना पत्रकार परिषद घ्यायला दोन दिवस जरी उशीर झाला असता तर आज नगर अर्बन बँकेला टाळे लागलेले असते, त्यामुळे हा पहिला चमत्कार झाल्याचे गांधी म्हणाले. त्यानंतर (स्व.) गुंदेचा यांनी 12 ऑक्टोबर 2018 ला जे 36 कोटी वाचवले, त्या बोगस कर्जदाराला दि. 29 जुलै 2019 रोजी पुन्हा 23 कोटी मंजूर करण्यात आले व बँकेचेच 78 लाख रुपये खर्च करून कर्ज मंजुरीचे तांत्रिक चार्जेस म्हणजे अगदी कर्ज अर्जाचे 10 रुपये पण बँकेनेच भरले होते. 29 जुलै 2019ला हे कर्ज मंजूर झाल्यावर 30 जुलैला सुट्टी आली व 31 जुलैला अमावस्या आल्यामुळे संबंधित कर्जदाराने ही 23 कोटीची रक्कम उचलली नाही. पण त्याच दिवशी सायंकाळी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले व 1/08/2019 ला सकाळी 10.30 ला बँकेचा ताबा रिझर्व्ह बँक नियुक्त प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी घेतला व त्यांनी हे 23 कोटी रकमेचे वितरण थांबविले व बँक पुन्हा वाचली. प्रशासक एक दिवस जरी विलंबाने आले असते तर आज बँक बंद पडलेली असती.त्यामुळे हा दुसरा चमत्कार घडल्याचे सांगून गांधी म्हणाले, आज बँकेचे एकूण कर्ज 635 कोटी व ठेवी 685 कोटी आहेत म्हणजे बँकेकडे फक्त 50 कोटीची तरलता बाकी आहे. 2018 मधील 36 कोटी किंवा 2019 मधील 23 कोटीची रक्कम गेली असती व त्यावर आजपर्यंतचे व्याज मिळवले तरीही ही तरलता आज संपलेली असती व रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँक बंद केली असती, असा दावा गांधी यांनी केला. बँकेच्या कोणतेही पदावर नसलेल्या व फक्त सभासद असलेल्या बँक बचाव समितीला रिझर्व्ह बँकेने चर्चेला बोलविणे हा देखील तिसरा चमत्कार होता. 1 ऑक्टोबर 2021ला बँक बचाव समितीची रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत बचाव कृती समितीने वसुलीचा अ‍ॅक्शन प्लॅन दिला व त्यामुळे रिझर्व्ह बँकेने निवडणुकीला परवानगी दिल्याने बँक पुन्हा वाचली, असा दावा करून, गांधी म्हणाले, वेळोवेळी चमत्कार होवून वाचलेली ही वैभवशाली बँक असून, बँकेवर निष्कलंक व प्रामाणिक संचालक मंडळ सत्तेवर येणार व प्रभावी वसुली होऊन बँक नक्की वाचणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांच्या खोटेपणाने बँक अडचणीत सुवेंद्र गांधी
नगर अर्बन बँकेबाबत विरोधकांनी खोटा प्रचार, तक्रारी करीत सभासद व ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे पतसंस्थांसह अनेकांनी ठेवी काढल्या. विरोधकांच्या या खोटेपणामुळेच बँक अडचणीत आल्याचा आरोप माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केला. नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर श्रीरामपूरमध्ये गांधी यांनी सभासदांच्या गाठीभेची घेतल्या. यावेळी अ‍ॅड. राहुल जामदर, नगरसेवक किरण लुणिया, प्रकाश चित्ते, सुदर्शन शितोळे आदी उपस्थित होते. गांधी म्हणाले, सभासदांच्या विश्‍वासामुळे नगर अर्बन बँकेच्या शाखा विस्तार झाला. परंतु विरोधकांनी खोटे आरोप केल्यामुळे बँकेची बदनामी झाली. पिंपरी-चिंचवड शाखेत 22 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. नगर येथे 3 कोटी रुपयांचा चिल्लर घोटाळा आदी आरोप केले. रिझर्व्ह बँकेकडे तक्रारी केल्या. व्यक्तिगत द्वेषातून जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले. बँकेवर प्रशासक आल्यावर अनेक ठेवीदारांनी ठेवी काढून घेतल्या. एनपीए वाढला. बँक ही वित्तीय संस्था असल्याने स्वर्गीय दिलीप गांधी यांनी प्रामाणिक काम केले. आता सर्व पक्षांच्या नेत्यांना बरोबर घेऊन सभासदांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.

COMMENTS