वर काजूच्या गोण्या..त्याखाली दारूचे बॉक्स

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर काजूच्या गोण्या..त्याखाली दारूचे बॉक्स

पण उत्पादन शुल्क विभागाच्या पथकातील अधिकार्‍यांना संशय आला व त्यांनी मग या गोण्या हटवून तपासणी केली असता काजू गोण्यांखाली विदेशी दारूचे बॉक्स दडवून ठेवल्याचे आढळले. संगमनेर येथे ही घटना घडली.

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून किचनमध्ये पुरला मृतदेह l पहा LokNews24
’राष्ट्रवादी’च्या कर्जत तालुकाध्यक्षपदी अशोकराव जायभाय
कोपरगावमध्ये शुक्र तीर्थ ऑडिओ बुकचे अनावरण  

अहमदनगर/प्रतिनिधी-ट्रकमध्ये वर काजूच्या बियाणे भरलेल्या गोण्या ठेवल्या होत्या. पण उत्पादन शुल्क विभागाच्या पथकातील अधिकार्‍यांना संशय आला व त्यांनी मग या गोण्या हटवून तपासणी केली असता काजू गोण्यांखाली विदेशी दारूचे बॉक्स दडवून ठेवल्याचे आढळले. संगमनेर येथे ही घटना घडली. यात 86 लाखाची गोवा येथून चोरुन आणलेली दारू उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांंनी जप्त केली. 

अवैध दारू धंद्याला आळा बसावा या उद्देशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक जिल्हाभरामध्ये धाडसत्र टाकत असतानाच संगमनेर येथे काजूच्या गोण्यांखाली 86 लाख रुपयांची विदेशी दारू पथकाने हस्तगत केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुद्देमालासह ट्रकचालकास जेरबंद करण्यात आले आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) शिवारात ही कारवाई करण्यात आली. ट्रकचालकास अटक करण्यात आली असून एकजण पसार झाला आहे. या कारवाईत एकूण 86 लाख 47 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व भारतसिंग बापूलाल प्रजापती (वय 32, रा. गादियामेर, जि. राजगड, मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली.

 दारूची मिळाली होती माहिती

अनेक वर्षापासून दारू वाहतुकीचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातच गोवा व अन्य राज्यातून दारू विक्रीसाठी सर्रासपणे आणली जाते. या पार्श्‍वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने सध्या जिल्हाभर वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. ती सुरू असताना संगमनेरजवळ ही कारवाई करण्यात आली. गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या दारूची पुणे-नाशिक महामार्गाने वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनुसार, नगर व पुणेच्या भरारी पथकाने संयुक्तरित्या सापळा लावून ट्रक ताब्यात घेतला. ट्रकमध्ये वर काजूच्या बियाणे भरलेल्या गोण्या ठेवल्या होत्या. पण पथकातील अधिकार्‍यांनी या गोण्या हटवून तपासणी केली असता आतमध्ये विदेशी दारूचे बॉक्स होते. गोवा येथून ही दारू गुजरात येथे नेण्यात येत होती. या ट्रकमधून रॉयल चॅलेंज व्हिस्की, व्होडका, किंग फिशर बियर अशा विविध कंपनीच्या दारुचे बॉक्स जप्त करण्यात आले. अधिकार्‍यांनी ट्रकचालकाची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे कोल्हापूर येथून काजू बिया खरेदी करून त्या नाशिक येथे नेण्यात येत असल्याचे बिल आढळून आले. प्रत्यक्षात मात्र त्यामध्ये दारूची वाहतूक केली जात होती.

उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक संजय सराफ, निरीक्षक आर. डी. वाजे, एस. एस. पाडळे, बिराजदार, पुणे येथील भरारी पथकातील निरीक्षक एन. सी. परते, दुय्यम निरीक्षक पातळे, ए.जे. यादव, पी. एस. कडभाने, नेहाल उके, दीपक बर्ड, एस. एम. मुजमुले, एस. डी. साठे, विजय मेहेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS