वरळीतील महात्मा गांधी मैदानाच्या दर्जोन्नती आणि सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरळीतील महात्मा गांधी मैदानाच्या दर्जोन्नती आणि सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

मुंबईतील वरळी येथील महात्मा गांधी मैदानाच्या (जांबोरी मैदान) दर्जोन्नती आणि सुशोभीकरणाच्या कामाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले.

अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना नाट्यपरिषदेचा जीवनगौरव
कुडाळच्या कुंभार समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे स्वागत
लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी प्रकाश कासट

मुंबई दि. 2 : मुंबईतील वरळी येथील महात्मा गांधी मैदानाच्या (जांबोरी मैदान) दर्जोन्नती आणि सुशोभीकरणाच्या कामाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी अभ्यास गल्ली तसेच सर पोचखानवाला रोड आणि अब्दुल गफार खान रोड यामधील जोड रस्त्याच्या उन्नतीकरणाच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. विकासाची कामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार व्हावीत, असे निर्देश मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. 

खासदार अरविंद सावंत, स्थानिक नगरसेवक आशिष चेंबूरकर, माजी मंत्री सचिन अहिर, महानगरपालिकेचे सहआयुक्त श्री बालमवार, सहायक आयुक्त शरद उघाडे आदी यावेळी उपस्थित होते.

जांबोरी मैदान येथे सुमारे 10800 चौ. मीटर परिसराचे सुशोभीकरण आणि विकास करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा, बॅडमिंटन कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, भूमिगत ड्रेनेज व्यवस्था, आकर्षक विद्युत व्यवस्थेसह झाडांची जपणूकही केली जाणार आहे. तर जांबोरी मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन प्रवेशद्वार आणि चित्रांची मांडणी केली जाणार आहे.  वरळी येथील पोद्दार रूग्णालयाच्या मागील बाजूस ‘अभ्यास गल्ली’ ही नाविन्यपूर्ण कल्पना राबविली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना येथे बसून अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी आल्हाददायक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये बसण्याची आरामदायी सुविधा, सोलर पद्धतीने विजेची सोय, पदपथाच्या बाजूने झाडे, पिण्याच्या पाणी, प्रसाधन गृह, टाइल पेंटिंग यासह क्युआर कोडच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

COMMENTS