लोकमंथन व लोकन्यूज-24 ने केला कोरोना सेवाकार्याचा गौरव ; कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करणारे राज्यातील पहिले मराठी मिडिया हाऊस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकमंथन व लोकन्यूज-24 ने केला कोरोना सेवाकार्याचा गौरव ; कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करणारे राज्यातील पहिले मराठी मिडिया हाऊस

जनसामान्यांचे हक्काचे दैनिक म्हणून मागील 15 वर्षांपासून मराठी वृत्तपत्रसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यशस्वी ठरलेल्या नगरमधील दैनिक लोकमंथन व लोकन्यूज-24 या मिडिया हाऊसने बुद्धपौर्णिमेनिमित्त बुधवारी सामाजिक जाणीवेचा नवा आदर्श समाज व माध्यमजगतासमोर ठेवला.

संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
*LokNews24! देशात कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगसचा कहर
संस्कारक्षम पिढी घडविणे हे शिक्षणाचे ध्येय असावे ः माजी मंत्री टोपे

अहमदनगर/प्रतिनिधी-जनसामान्यांचे हक्काचे दैनिक म्हणून मागील 15 वर्षांपासून मराठी वृत्तपत्रसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यशस्वी ठरलेल्या नगरमधील दैनिक लोकमंथन व लोकन्यूज-24 या मिडिया हाऊसने बुद्धपौर्णिमेनिमित्त बुधवारी सामाजिक जाणीवेचा नवा आदर्श समाज व माध्यमजगतासमोर ठेवला. मागील दीड वर्षांपासून जगभरात हाहाकार उडवणार्‍या कोरोना महामारीशी फ्रंटलाईनवर राहून सामना करणार्‍या व सीमेवरील सैनिकाप्रमाणे स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणार्‍या कोरोनायोद्ध्यांच्या सेवा कार्याचा नगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. 

    नगरमधील घर घर लंगर सेवेद्वारे चालवल्या जात असलेल्या गुरू अर्जुनदेव कोविड केअर-नटराज कोविड सेंटर व जैन पितळे केअर सेंटरमधीलमधील योग प्रशिक्षक, डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, लॅब टेक्निशियन्स अशा सुमारे 40 जणांनी आतापर्यंत दीड हजारावर रुग्णांना नियमित उपचार व समुपदेशनाच्या माध्यमातून कोरोनातून मुक्ती मिळवून दिली आहे. त्यामुळे या सर्वांच्या कार्याला सलाम करण्याच्या उद्देशाने त्यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन त्यांचा हृद्य गौरव केला गेला. यावेळी दैनिक लोकमंथन व लोकन्यूज 24 मिडिया हाऊसचे प्रमुख संपादक डॉ. अशोक सोनवणे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री, दैनिक लोकमंथनचे निवासी संपादक बाळकुणाल अहिरे, दैनिक लोकमंथन व लोकन्यूज 24 मिडिया हाऊसचे व्यवस्थापकीय संपादक रोहित सोनवणे, घर घर लंगर सेवा उपक्रमाचे प्रमुख व उद्योजक हरजितसिंग वधवा आदींसह विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एखाद्या मराठी माध्यम समूहाने अशा पद्धतीने कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची ही मराठी वृत्तपत्रसृष्टीतील पहिलीच घटना आहे.

चांगल्या कामाला दाद

माध्यमजगत हे नेहमी प्रशासन-राजकीय वा सामाजिक व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करीत असले तरी त्यामुळे ते व्यवस्थेविरोधात असते, असे नाही. समाजव्यवस्थेत जे चुकीचे आहे, त्याला चुकीचेच म्हणण्याचे व त्याबाबत समाजजागृती करणार्‍या जागल्याचे काम माध्यम जगत करीत असते. पण याचसमवेत समाजकार्यातही माध्यम जगताने हिरीरीची भूमिका निभावली आहे. समाजात जे चांगले आहे व आदर्शवत आहे ते समाजासमोर मांडताना, त्यातून समाजाने प्रेरणा घेण्याचा उद्देश यामागचा माध्यम जगताचा असतो. याच भावनेने कोरोना महामारीशी लढताना खारीचा वाटा उचलणार्‍या राज्यभरातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याचे कर्तव्य दैनिक लोकमंथन व लोकन्यूज-24 माध्यमसमूहाने केले जाणार आहे.

हा उपक्रम दैनिक लोकमंथनच्या नगरसह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, जळगाव व हिंगोली या 14 आवृत्त्यांच्या कार्यक्षेत्रात टप्प्या टप्प्याने व कोरोना नियमांचे पालन करून करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

पत्रकारितेकडून कौतुक अभिमानास्पद

व्यवस्थेतील चुका सुधारल्या जाव्यात म्हणून पत्रकारितेतून टीका होत असली तरी व्यवस्थेकडून जे चांगले होत आहे, त्याचा गौरवही पत्रकारितेतून होतो, याचा प्रत्यय दैनिक लोकमंथन व लोकन्यूज 24 माध्यमसमूहातून आज आला व यात सहभागी होता आले, हा माझ्यादृष्टीने अभिमानाचा क्षण असल्याची भावना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. पत्रकारितेकडून मिळालेली शाबासकीची थाप कोरोना योद्ध्यांना आणखी प्रोत्साहन देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS