बीड/प्रतिनिधी : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व जनसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी सक्रिय असणारे पठाण अमरजान आजम खान यांची लोकतांत्रिक जनता दलाच्या य
बीड/प्रतिनिधी : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व जनसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी सक्रिय असणारे पठाण अमरजान आजम खान यांची लोकतांत्रिक जनता दलाच्या युवक जिल्हा अध्यक्षपदी लोकतांत्रिक जनता दलाच्या राष्ट्रीय महासचिव प्रा.सुशीला ताई मोराळे यांचा आदेशाप्रमाणे आज निवड करण्यात आली आहे.
असे की जिल्ह्यात सामाजिक चळवळीतून कष्टकरी,कामगार,विद्यार्थी व जनसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी सक्रिय असणारे सामाजिक एकोप्याचा वारसा जपत सक्रिय आंदोलनकारी अशी आपली वेगळी ओळख निर्माण करणारे युवा सामाजिक कार्यकर्ते पठाण अमरजान आजम खान यांची लोकतांत्रिक जनता दलाच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी लोकतांत्रिक जनता दलाच्या राष्ट्रीय महासचिव प्रा.सुशीला ताई मोराळे यांच्या आदेशाप्रमाणे व बीड जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या मार्गदर्शनाखाली लोकतांत्रिक जनता दलाच्या जिल्हा कार्यालय येथे आज निवड करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी पठाण अमरजान यांनी आम आदमी पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत लोकतांत्रिक जनता दलमध्ये प्रवेश केला होता, त्यांच्या निवडीबद्दल कष्टकरी,कामगार व विद्यार्थी वर्गातून आनंद व्यक्त होत असून ऐड.सय्यद अल्ताफ,शेख इलियास,शेख गुलाब,शेख महेमुद,सय्यद सज्जाद व इतर कार्यकर्त्यांनी पठाण अमरजान यांना शुभेच्छा दे पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
COMMENTS