मुंबई : महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेबद्दल विधानसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवर उत्
मुंबई : महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेबद्दल विधानसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, तसेच लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार मात्र बंद करणार नसल्याची स्पष्टोक्ती अजित पवार यांनी सोमवारी दिले आहेत.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून काही घोषणा करण्यात आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत दुरूस्ती करणार आहोत, पण योजना बंद करणार नाहीत, असे म्हणत अजित पवार यांनी योजनेत नवे निकष आणण्याचे संकेत दिले.
लाडकी बहीण देणार अर्थव्यवस्थेत योगदान
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या हातात मोठी रक्कम जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. हा थोडाथडका पैसा नाही. सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे, मोठे योगदान मिळेल, असे पवार म्हणाले.
COMMENTS