लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या  होण्याचे प्रमाण एकदम नगण्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण एकदम नगण्य

कोरोनावर प्रभावीपणे मात करण्यासाठी लसीकरण हे हत्यार आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे. असे असले तरी लस निर्मितीपासून ते लस घेईपर्यंत अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

महापालिकेच्या स्मशानभूमीतील शवदाहिणीचा स्फोट | LOKNews24
मागण्या मान्य केल्या नाहीत, तर अधिवेशन चालू देणार नाहीः मेटे
कृषिप्रदर्शनात मिळणार परिसंवादांची मेजवानी 

नवीदिल्लीः कोरोनावर प्रभावीपणे मात करण्यासाठी लसीकरण हे हत्यार आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे. असे असले तरी लस निर्मितीपासून ते लस घेईपर्यंत अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अनेकांनी लस घेण्याचे टाळले आहे. जगभरातून येणार्‍या वेगवेगळ्या बातम्यांनी नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या अनेक बातम्यांनी नागरिक धास्तावले आहेत. त्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय एईएफआय समितीने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे नमूद केले आहे.  

कोविशील्ड लसीकरणानंतर एकूण 498 जणांचा या प्रकरणी अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत रक्ताच्या गुठळ्या झाल्याची 26 प्रकरणे समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन संदर्भात एकही प्रकरण समितीला आढळून आले नाही. कोविशील्ड लस घेतल्यानंतर प्रति दहा लाख प्रकरणात 0.61 रिपोर्टींग रेट आहे. हेच प्रमाण इंग्लंडमध्ये दहा लाखांवर 4 आणि जर्मनीत दहा लाखांवर दहाव इतके आहे. त्यामुळे मंत्रालयाकडून एक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यात 20 दिवसांत कोणताही त्रास झाल्यास तात्काळ लसीककरण केंद्रावर जाण्यास सांगण्यात आले आहे. समितीच्या अहवालानुसार देशात सात एप्रिलपर्यंत एकूण सात कोटी 54 लाख जणांना लस देण्यात आली आहे. त्यात कोविशील्ड सहा कोटी 86 लाख पन्नास हजार 819 तर कोव्हॅक्सिनचे डोस 67 लाख 84 हजार 562 जणांना देण्यात आली आहे.

COMMENTS