Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणारचा तपशील उघड !

सुप्रिया सुळे केंद्रात, जयंत पाटील, रोहित पवारांना मंत्रिपदेमुंबई ः  दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलीनीकरणासंदर्भात पडद्यामागे झालेल्

सरकार गेलेले सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर; पडळकरांची टीका
तलाठी परीक्षेतील गोंधळाची एसआयटी चौकशी करा
महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवायचे ः जयंत पाटील

सुप्रिया सुळे केंद्रात, जयंत पाटील, रोहित पवारांना मंत्रिपदे
मुंबई ः  दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलीनीकरणासंदर्भात पडद्यामागे झालेल्या चर्चांचे काही तपशील समोर आल्याने राज्याच्या राजकारणात नव्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलीनीकरणानंतर एकत्रित राष्ट्रवादी पक्षाने महायुतीत सहभागी व्हावे, असा प्राथमिक आराखडा चर्चेत होता.
या आराखड्यानुसार, केंद्र सरकारमध्ये सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव होता, तर राज्य मंत्रिमंडळात शरद पवार गटातील एका प्रमुख नेत्याला स्थान देण्याबाबत चर्चा झाली होती. तसेच, एकत्र येणार्‍या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, अशी रूपरेषा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील बैठकीत मांडण्यात आल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद, तर जयंत पाटील यांना राज्यात कॅबिनेट मंत्रिपद देण्यावर चर्चा झाली होती. यासोबतच रोहित पवार यांनाही राज्यात राज्यमंत्रीपद देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नव्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यावरही एकमत झाल्याचे सांगितले जाते. केंद्रातील राजकीय समन्वयाची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे, तर राज्यातील पक्षकारभाराची संपूर्ण सूत्रे अजित पवार यांच्याकडे राहतील, असा आराखडा चर्चेत होता. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या चर्चांना अधिक वेग मिळाल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटातील नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये विलीनीकरणाबाबत अंतिम टप्प्यापर्यंत चर्चा झाल्याचा दावा केला आहे. यासाठी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचा उल्लेख करण्यात येत आहे. मुंबईत 23 डिसेंबर रोजी जयंत पाटील यांच्या घरी झालेल्या बैठकीत शरद पवार गटातील सुमारे 14 नेते उपस्थित होते. अजित पवार यांच्यासोबत जवळपास अडीच तास ही चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीत दोन्ही गटांनी एकत्र येऊन महायुतीत सहभागी होण्याच्या पर्यायावर गांभीर्याने विचार केल्याचे सांगितले जाते. केंद्र व राज्यातील मंत्रिपदांची शक्यता तसेच संघटनात्मक निर्णयप्रक्रियेची चौकट यावर चर्चा झाली होती. याआधी कराड येथे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात स्वतंत्र बैठक झाल्याची माहितीही समोर आली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चर्चेची सूत्रे अजित पवार स्वतः हाताळत होते, तर शरद पवार गटातील प्रमुख नेते त्यात सहभागी होते. विलीनीकरणानंतर पक्षरचना, निर्णयप्रक्रियेची दिशा आणि महायुतीत सहभागी होण्याची भूमिका या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

विलीनीकरणाचे आधी भाजपला विचारावे लागेल ः भुजबळ
दरम्यान, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या संदर्भात वेगळी भूमिका मांडत, असे कोणतेही विलीनीकरण करायचे असल्यास आधी भाजपशी चर्चा करावी लागेल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या संभाव्य राजकीय समीकरणात भाजपची भूमिका काय असेल, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या चर्चांवर अधिकृत भूमिका किंवा नवे राजकीय संकेत मिळतात का, याची उत्सुकता वाढली आहे.

COMMENTS