राशीनच्या पालखी सोहळ्यातून महिलेचे मंगळसूत्र पळवले ;मुलाने केला पाठलाग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राशीनच्या पालखी सोहळ्यातून महिलेचे मंगळसूत्र पळवले ;मुलाने केला पाठलाग

कर्जत/प्रतिनिधी : दसऱ्याच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील राशीन येथे जगदंबा देवीचा पालखी उत्सव सुरू असतानाच एक अनुचित प्रकार घडला. महिलेच्या अंगावरील

आरबीआयच्या पथकाकडून ’नगर अर्बन’बँकेमध्ये तपासणी | DAINIK LOKMNTHAN
पत्रकार बाळ बोठेला हायकोर्टाचा दणका ; जामीन अर्ज फेटाळला | DAINIK LOKMNTHAN
नगर अर्बन बँकेला दिला रिझर्व्ह बँकेने तो इशारा?

कर्जत/प्रतिनिधी : दसऱ्याच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील राशीन येथे जगदंबा देवीचा पालखी उत्सव सुरू असतानाच एक अनुचित प्रकार घडला. महिलेच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळविल्याची घटना शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास भिगवण रोड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एक चार चाकी गाडी ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राशीन येथे पालखी उत्सव सुरू असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने ओढले. महिलेने आरडाओरड केल्याने त्यांच्या मुलाने चोरट्याचा पाठलाग सुरू केला. मात्र चोरटा पळत जाऊन स्विफ्ट गाडीमध्ये जावून बसला. चालकाने जोरात गाडी चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी अडवल्याने चोरट्यांनी गाडी तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली.
घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्विफ्ट डिझायर गाडी (एमएच ३, बीसी ४७२) ताब्यात घेतली. याप्रकरणी राशीन येथील सतीश महादेव भांडवलकर यांनी कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीदास सातपुते करीत आहेत.

COMMENTS