राज ठाकरे यांचे शिवसेनेचे आव्हान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे यांचे शिवसेनेचे आव्हान

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून सुरू झालेल्या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेचा नवा चित्रपट चर्चेत
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 
उद्धव ठाकरे आणि माझे शत्रुत्व नाही

मुंबई / प्रतिनिधीः नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून सुरू झालेल्या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. नवी मुंबईतील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज यांची आज त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर राज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले जाईल असे सांगितले. पत्रकार परिषदेमध्ये राज यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आमदारांची बैठक झाली त्यासंदर्भात प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राज यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. 

नवी मुंबईमधील विमानतळ हे सध्याच्या विमानतळाचे एक्सटेंशन असणार आहे असं सांगत राज यांनी विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे राहणार असल्याचे म्हटले. सध्याच्या विमानतळावर प्रवासी उतरल्यावर विमाने दुसरीकडे पार्क करावी लागत आहेत असे सांगतानाच नवे विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, तर सध्याचे विमानतळ हे डोमेस्टीक एअरपोर्ट होईल असे राज यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हे विमानतळ पूर्ण होण्यासाठी आणखी किमान पाच वर्षांचा कालावधी लागेल असेही राज म्हणाले. नामकरणावरुन सुरू असणारा वाद हा जाणीवपूर्वक उकरुन काढला जातो, की नाही हे ठावूक नाही; पण एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलतो, असे राज म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर काय चर्चा करणार? ज्यांना काय गोंधळ घालायचा तो घालू द्या. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव राहणार आहे, अशी भूमिका राज यांनी घेतली.  नामांतरणावरुन सुरू असणारा वाद हा दुर्दैवी आहे, असे सांगतानाच राज यांनी हे विमानतळ लवकर कसे होईल यासाठी राज्य सरकारने रेटा लावला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे विमानतळाच्या उभारणीमध्ये येणार्‍या अडचणींच्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. नावांसारख्या विषयांमध्ये आपल्याकडचे लोक गुंतून राहतात त्यामुळे ते बरे पडते, असा टोलाही राज यांनी लगावला. रस्त्यावरचा संघर्ष पाहायला मिळाले असे ठाकूर यांनी सांगितले आहे, असा प्रश्‍न विचारला असता राज यांनी, मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली की काय होईल. महाराजांचे नाव आल्यानंतर रस्त्यावरच्या संघर्षाचा विषय येईल असे मला वाटते नाही, असे मत व्यक्त केले.

COMMENTS