राज्यात पुढील काही दिवसांत पाऊस होणार सक्रीय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढील काही दिवसांत पाऊस होणार सक्रीय

मुंबई : बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसासाठी पुन्हा पोषक हवामान तयार व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानुसा

स्टंट करताना ट्रेनला धडकल्याने तरुण गंभीर जखमी
राहुरी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींवर महिलाराज
शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्यावर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही l LOK News 24

मुंबई : बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसासाठी पुन्हा पोषक हवामान तयार व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत बहुतांश जिल्ह्यांना हाय अलर्ट दिला आहे. विदर्भासह मध्य महराष्ट्र आणि दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ११ जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.

उपरोक्त या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्याही राज्यात कमी जास्त प्रमाणात अशीच स्थिती राहणार आहे. मात्र सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी परभणी जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मंगळवारी नाशिक, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने उसंत घेतली आहे. मात्र ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता यापूर्वीच हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

COMMENTS