राज्यात दहीहंडीला परवानगी नाहीच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात दहीहंडीला परवानगी नाहीच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी : दहीहंडी या उत्सवास परवानगी दिल्यास कोरोनाचा संसर्ग मोठया वेगाने वाढू शकतो, असा अहवाल टास्क फोर्सने दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाक

पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राणेंच्या वक्तव्याचे नाशकात पडसाद; भाजप कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक
शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषि संकुल असावे – मुख्यमंत्री

मुंबई/प्रतिनिधी : दहीहंडी या उत्सवास परवानगी दिल्यास कोरोनाचा संसर्ग मोठया वेगाने वाढू शकतो, असा अहवाल टास्क फोर्सने दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडीला परवानगी नाकारली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मनसे आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे मागील वर्षी मुंबई, ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. तसेच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असे या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला निर्दशनास आणून दिले. मात्र मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे परवानगी देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली. आम्ही गोविंदा पथकांवर लक्ष कसे ठेवणार. यंत्रणांवरील ताण वैगेरे पाहता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आवाहन केले आहे. परवानगी नसल्याने आम्ही दहीहंडीचे आयोजन न करण्याची भूमिका घेणार आहोत, असे समन्वय समितीने सांगितले आहे. गेल्या दीड वर्षापासून देशभरात कोरोना ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

मनसेचा आक्रमक पवित्रा
राज्यात सर्वच निर्बंध शिथिल केल्यानंतर धार्मिक स्थळावर बंदी का, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता. यामागे धार्मिक कारण नसून, अनेकांचा रोजगार त्यावर अवलंबून असल्याचे आर्थिक गणित देखील त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारल्यानंतर मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे. यंदा 31 ऑगस्ट रोजी विश्‍वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचे मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्ट करून हे जाहीर केले आहे.

आरोग्यासाठी सणवार, उत्सव बाजूला ठेऊया : मुख्यमंत्री
कोरोनाचे संकट अजून टळलेले नसून, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करून, तोपर्यंत सणवार उत्सवाला बाजूला ठेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राज्य सरकारचे प्रथम प्राधान्य जनतेचे प्राण वाचवण्याचे असल्यामुळे, दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्य विषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले की, सणवार, उत्सवाबाबतच्या आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत पण आज विषय आरोग्याचा आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याचा आहे. त्यामुळे जेंव्हा पहिले प्राधान्य कशाला द्यायचे हा प्रश्‍न समोर येतो तेंव्हा साहजिकच पहिल्यांदा आरोग्याचा विचार करावा लागतो. मागील दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणुविरूद्ध लढत आहोत, त्यामुळे आपल्यावर बंधने आली आहेत, पण ही बंधने कुणासाठी याचा देखील विचार करण्याची गरज आहे. या निर्बंधाविरुद्ध आंदोलन करण्याचे काहीजण बोलतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे.

COMMENTS