"काळ बदलला आहे; केवळ, एका जातीच्या आधारावर सत्ता मिळवता येत नाही. महाराष्ट्रात केवळ मराठा समाजाच्या बळावर सत्ता मिळवणे अवघड आहे ", हे वक्तव्य कोण

“काळ बदलला आहे; केवळ, एका जातीच्या आधारावर सत्ता मिळवता येत नाही. महाराष्ट्रात केवळ मराठा समाजाच्या बळावर सत्ता मिळवणे अवघड आहे “, हे वक्तव्य कोण्या राजकीय विश्लेषकाचे नसून महाराष्ट्राचे राजकीय धुरंधर असणारे शरद पवार यांचे हे वाक्य साधारणपणे आठ-दहा वर्षांपूर्वीचे एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. राज्याचीच नव्हे, तर, देशाच्या राजकीय वाऱ्याला शरद पवार यांनी खूप आधीच ओळखले असले तरी, त्यांचा अति आत्मविश्वास मात्र, त्यांना धोका देतो. आज दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रिकरण करण्याच्या चर्चेला त्यांनीच प्रसूत केले. यातून त्यांचा माईंड गेम दिसतो, तो म्हणजे पक्षाचे दोन गट एकत्र आल्याने पक्षाची महाराष्ट्रात राजकीय शक्ती वाढली, असं लोकांच मत बनेल. मात्र, ते हे वास्तव विसरतात की, हे दोन्ही गट वर्षानुवर्षे एकत्रच होते. तरीही, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची एकट्याने सत्ता आणता आली नाही. शरद पवार हे म्हणतात की, आमच्या गटात काही लोक अजित पवार यांच्या बाजूने जाण्याची भूमिका घेत आहेत; परंतु, त्याविषयी जो काही निर्णय घ्यायचा तो खासदार सुप्रिया सुळे या घेतील, असं म्हणत त्यांनी गटांच्या एकत्रिकरणाची मेख मारली. याचा सरळ अर्थ एवढाच होतों की, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सत्तालोलुप लोकांनी मिळून बनले आहेत. त्यामुळे, सत्तेशिवाय त्यांचा जीव गुदमरतो. किंबहुना, सत्तेच्या शोधातच हे लोक असतात. अजित पवार यांनी सत्तेचा मार्ग पत्करला त्याचे खरे कारण हेंच आहे की, या लोकांचा पक्ष सत्तेशिवाय तग धरू शकत नाही. आज, महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुत्सद्दीपणावर उभे आहे. शरद पवार यांचे राजकीय मुत्सद्दीपण आणि संघटन कौशल्य नव्या पिढीला आकर्षित करू शकत नाही. नवी पिढी स्वीकारते फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. याचा सरळ अर्थ हाच होतो की, पवार कुटुंबाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही. दोन गटाचे एकत्रिकरण हे म्हणायला आहे; परंतु, खऱ्या अर्थानं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सरेंडर करण्याचीच कृती असणार आहे. परंतु, आपल्या स्वपक्षातील नेत्यांना सत्तेवर आणणं एवढाच अर्थ याचा नाही. तर, जे सहकार क्षेत्र पवारांनी आपल्या कुटुंबाचा व्यवसाय बनवला त्याची धुरा सध्या केंद्राकडे गेली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळात ताकदवर मंत्री असणारे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार चळवळ मजबूत होईल, याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या “सहकार चळवळीचा इतिहास” या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. खरेतर, थोरल्या पवारांच्या हातातूनही सहकार क्षेत्र निसटत चालले असल्याने हा सरेंडर करण्याचा आटापिटा आहे. शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांच्या तीन भेटी लगोलग झाल्या. त्यात पहिली भेट एक सहकार संस्थेच्या अंतर्गत कार्यक्रमातच झाली. त्यानंतर सलग एकूण तीन भेटी त्यांच्या झाल्या. त्याच दरम्यान सहकाराच्या अनुषंगाने एखादा कार्यक्रम ठरवून त्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्याचे ठरले असावे. परंतु, सहकार चळवळीचा कोणताही ऐतिहासिक दिवस नसताना अचानक त्यावर कार्यक्रम घेणे योग्य वाटले नसते, म्हणून त्यासोबत एक ऐतिहासिक कार्यक्रम जोडून सहकाराचा कार्यक्रम बनविण्यात आला. त्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणे एवढाच असावा. पण, काही असो, एवढं तर, निश्चित झाले की, सध्याच्या काळात महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पर्याय नाही; ही बाब चाणाक्ष असणारे शरद पवार यांच्या लक्षात आली. या भेटीनंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू केली; किंबहुना, त्या चर्चेचे सुतोवाच केले. राजकारणात कोणतीही गोष्ट सहज होत नसते, हेच खरे.
COMMENTS