कोरोनाच्या साथीमुळे प्रत्येक बुधवारी भरणारा आठवडी बाजार रिंगावण पेठेतील यात्रा मैदानात भरविला जाणार असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी डॉ.
म्हसवड / वार्ताहर : कोरोनाच्या साथीमुळे प्रत्येक बुधवारी भरणारा आठवडी बाजार रिंगावण पेठेतील यात्रा मैदानात भरविला जाणार असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी दिली.
येथील आठवडी बाजार पालिका कार्यालय नजीकच्या बाजार पटांगणात भरविला जात होता. या ठिकाणी गावोगावहून भाजीपाला, शेतीमाल, फळे विक्रीसाठी येणार्या शेतकरी तसेच व्यापार्यांना जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे आठवडी बाजार दाटीवाटीने भरत होता. बाजारात खरेदीसाठी येणार्या नागरिकांची गर्दी पाहता संभाव्य कोरोनाच्या साथीचा संसर्ग टाळण्यासाठी व शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षतेच्या दृष्टीने रिंगावण पेठेतील प्रशस्त यात्रा मैदानात बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजारातील प्रत्येकाने तोंडी मास्क लावून सुरक्षित अंतर ठेऊनच येण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी केले आहे.
COMMENTS