मोबाईल शॉपी फोडणार्‍या  दोघा सराईतांना पकडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोबाईल शॉपी फोडणार्‍या दोघा सराईतांना पकडले

नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून 1 लाख 8 हजार 90रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

20 लाखाचे आमीष दाखवून 17 लाखाला घातला गंडा…
नदीला पूर तरी कोपरगावाकरांना 8 दिवसाआड पाणी
पोलिस ठाण्यांमधील मुद्देमाल असुरक्षित?… होणार आता तपासणी

अहमदनगर/प्रतिनिधी- नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून 1 लाख 8 हजार 90रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई एमआयडीसी परिसरात केली गेली. या कारवाईत गणेश विठ्ठल आव्हाड (वय 23, रा.गजानन कॉलनी, नवनागापूर, नगर)  व सलीम शौकत सय्यद (रा. तामसवाडी, ता. नेवासा, हल्ली रा. एमआयडीसी, नगर) यांना पकडण्यात आले. 

    शुक्रवारी (दि. 4) सलीम सांडू शेख (वय 47  धंदा मोबाईल शॉपी, रा. जळके, ता. नेवासा) यांचे देवगड फाटा येथे सलीम मोबाईल शॉपी हे दुकान असून ते बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा काढून दुकानामधील 53 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल चोरुन नेले होते. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना हा गुन्हा गणेश आव्हाड याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी एमआयडीसी परिसरात फिरुन आरोपीचा शोध घेवून गणेश आव्हाड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता प्रथम तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर त्याला विश्‍वासात घेवून चौकशी केली असता हा गुन्हा त्याने व सलीम सय्यद असा दोघांनी मिळून केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर सलीम सय्यदला ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनीही गुन्ह्यातील चोरलेले 10 मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 53 हजार किंमतीचा मुद्देमाल काढून दिला. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज डिस्कव्हर मोटार सायकल (एमएच-20-डीए 6798) असा एकूण 1 लाख 8 हजार 90 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गणेश आव्हाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. त्याला व त्याच्या साथीदाराला पकडण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सफी मन्सूर सय्यद, पोलिस नाईक संतोष लोढे, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, कॉन्स्टेबल आकाश काळे, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, मच्छिन्द्र बडेर्र्, प्रकाश वाघ, रवींन्द्र घुंगासे, विजय धनेधर यांनी केली.

COMMENTS