बलिदानाच्या आणि त्यागाच्या जोरावर आपला देश लोकसत्ताक झाला आहे.गेल्या 70 वर्षात देशाने सार्वजनीक क्षेत्रात मोठी उंची गाठली आहे. सध्या देशात खाजगीकरणाच
बलिदानाच्या आणि त्यागाच्या जोरावर आपला देश लोकसत्ताक झाला आहे.
गेल्या 70 वर्षात देशाने सार्वजनीक क्षेत्रात मोठी उंची गाठली आहे. सध्या देशात खाजगीकरणाचं वार वाहत आहे. यावरून विरोधी पक्ष काॅंग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खाजगीकरणावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशाला दिशा देण्याचं काम पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात झालं आहे. आज देशाचा जो विकास होत आहे त्याची नेहरूंनी पायाभरणी केली. पायाभरणी केलेल्या गोष्टी मोदींनी विक्रीस काढल्या आहेत.
आपल्या उद्योगपती मित्रांच्या घश्यात देश घालण्याचं काम मोदी करत आहेत, अशी जहरी टीका नाना पटोले यांनी मोदींवर केली आहे.
COMMENTS