मोदींचा बांगलादेश दौरा आचारसंहितेचा भंग : ममता बॅनर्जी

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

मोदींचा बांगलादेश दौरा आचारसंहितेचा भंग : ममता बॅनर्जी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत.

अदानी प्रकरणात लपवण्यासारखे काहीही नाही
१४ वर्षीय मुलीची सामुहिक बलात्कारानंतर हत्या | DAINIK LOKMNTHAN
केजरीवालांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा निनवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी केला. पश्चिम बंगालमधील खडगपूर येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. 

यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्यात निवडणूक होत असून पंतप्रधान बांगलादेशात जाऊन बंगालवर व्याख्यान देत आहेत. हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघण आहे. पंतप्रधान मोदींनी आज, शनिवारी ईश्वरीपूर गावातील प्राचीन जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊनही दर्शन घेतले आणि पूजा केली. बांगलादेशातील ओरकांडी येथे जाऊन मतुआ समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. यापूर्वी त्यांनी मतुआ समाजाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नंतर समुदायाच्या लोकांना संबोधित केले. पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत असतानाच पंतप्रधान मोदींनी मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा केली. पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाची संख्या जवळपास 2 कोटी एवढी आहे. हा समाज पश्चिम बंगालमधील मतांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या दौऱ्यावर आक्षेप नोंदवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

COMMENTS