मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खामोशी से सुनता हूं, जबाब देने का हक मैं ने वक्त को दे रखा हैं… भुजबळांचा इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खामोशी से सुनता हूं, जबाब देने का हक मैं ने वक्त को दे रखा हैं… भुजबळांचा इशारा

प्रतिनिधी : नाशिकमहाराष्ट्र सदनाच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुर

टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावे लागेल: संजय राऊत (Video)
दिल्लीसह उत्तरेत भूकंपाचे सौम्य धक्के
जनतेचा सरकारवरील विश्‍वास उडाला

प्रतिनिधी : नाशिक
महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

त्यांच्यासह इतर सहा आरोपींनाही दोषमुक्त केले आहे. यावर भुजबळ यांनी भूमिका मांडली. तसेच त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला खडेबोलही सुनावले आहे . न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भुजबळ नाशिक येथे आले होते . यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले .

केंद्र सरकारचा कारभार तर अवर्णनीय आहे. आता लोक हुशार झाले आहे, जास्त काळ आपण लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, हे सिद्ध झाले . तुम्ही सरळ वागलात की तुमचा भुजबळ करू, हा वाक्यप्रचार झाला होता,

आता तो बदलावा लागेल, असा टोला भुजबळ यांनी लगावला. ‘मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खामोशी से सुनता हूं, जबाब देने का हक मैं ने वक्त को दे रखा हैं’ अशा शब्दातही भुजबळ यांनी विरोधकांना सुनावले .

मागील चार -पाच वर्षांपासून माझ्या कार्यकर्त्यांना मला तुरुंगात पाहावेसे वाटत नव्हते. याचं दुःख होतं. तुरुंगात असताना भुजबळांना तुरुंगातून सोडा, या मागणीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

असंख्य लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहे, असेही भुजबळ म्हणाले . तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विधानसभा निवडणूक लढलो . त्यावेळीही अनेकांनी माझ्यावर निशाणा साधला .

राजकारणात प्रहार सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या राजकारणातील लोकांची सहनशक्ती कमी होत चालली असल्याचेही भुजबळ म्हणाले .

COMMENTS