मेधा कुलकर्णी यांचे राजकीय पुनर्वसन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेधा कुलकर्णी यांचे राजकीय पुनर्वसन

कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अकरावीचे प्रवेश होणार दहावीच्या गुणांवरच l DAINIK LOKMNTHAN
निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं – राज ठाकरे यांचा आशिष शेलार यांना टोला  
नदी परिसर स्वच्छ म्हणजे गाव स्वच्छ : प्रा मधुकर राळेभात 

पुणे/प्रतिनिधीः कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुलकर्णी यांच्या रूपाने पुण्यातील महिलेला पहिल्यांदाच एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. 

    महाराष्ट्रातून महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या त्या एकमेव पदाधिकारी आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत कुलकर्णी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2019च्या निवडणुकीत भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिल्याने कुलकर्णी यांचा पत्ता कापला गेला. त्यानंतर कुलकर्णी यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असे बोलले जात होते; मात्र अद्याप त्यांना ही जबाबदारी दिली गेली नव्हती. त्यातच तिकीट कापले गेल्याने कुलकर्णी नाराज असल्याचीही चर्चा होती; परंतु आता त्यांना थेट राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. ’गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल पक्षाने घेतली असून, दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडेन,’ अशी प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

COMMENTS