एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील चक्क सहा जणांची हत्या केली. विशेष म्हणजे यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
विशाखापट्टणमः एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील चक्क सहा जणांची हत्या केली. विशेष म्हणजे यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. आरोपीने सहा जणांची हत्या करून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलीच्या बलात्काराचा बदला म्हणून आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
संबंधित घटना ही विशाखापट्टणमजवळच्या जट्टादा गावात घडली आहे. या गावातील एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील सहा जणांचा जीव घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये शत्रूत्व होते. हत्या झालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीने आरोपीच्या मुलीवर बलात्कार केला. त्यातून त्याने इतक्या लोकांच्या हत्या केल्या, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ज्या व्यक्तीने बलात्कार केला, तो सध्या फरार आहे. त्याने बलात्कार केल्याची माहिती आरोपीला कळताच त्याला प्रचंड संताप आला. त्याचा स्वत:वरील संयम सुटला आणि त्याने सहा जणांची हत्या केली.
COMMENTS