मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे…

अहमदनगर : प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा तसेच पदाधिकारी आढावा बैठक काल अहमदनगर येथे झाली. याचे उदघाटन रास

लोकसभेसाठी पाच जागा द्या, अन्यथा सर्व पर्याय खुले
भुजबळांसमवेज युतीस तयारी; महादेव जानकरांनी भूमिका
परभणीत महादेव जानकर यांना मोठा धक्का

अहमदनगर : प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा तसेच पदाधिकारी आढावा बैठक काल अहमदनगर येथे झाली.

याचे उदघाटन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर टीका केली. 

‘भाजपने आमचा विश्वासघातच केला आहे’, या म्हणण्यावर मी कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी जानकर म्हणाले की, ‘भाजपा पक्ष जिंतुर आणि दौंडची जागा आम्हाला देणार होते. मात्र, त्यांनी ती जागा आम्हाला दिली नाही. 

याचा जाब भाजपाच्या नेत्यांना विचारला पाहिजे. मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे. या मतावर मी आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार आहे. 

त्याचबरोबर, राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. केंद्र व राज्याच्या निवडणुकीत, सत्तेत त्यांच्याबरोबर आहोत. मात्र, स्थानिक निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार. 

ज्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये भाजपासोबत होतो, त्यावेळीसुद्धा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढलो. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावरच निवडणूक लढणार आहे.”

COMMENTS