मान्सून मे अखेरीस केरळात दाखल होण्याची शक्यता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मान्सून मे अखेरीस केरळात दाखल होण्याची शक्यता

मान्सूनवर 'यास' चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मान्सून ३१ मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

कैलास पर्वताचे दर्शन होणार 1 ऑक्टोबरपासून
कर्मवीरांसोबत आदर्श शिक्षकांमुळे जीवन परिपूर्ण झाले ः  प्रा. विलासराव तुळे
अखेर वंचितंच्या बोंबाबोंब आंदोलनाची दखल ः अँड. डॉ. अरुण जाधव

नवी दिल्ली : मान्सूनवर ‘यास’ चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मान्सून ३१ मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. केरळच्या काही भागांत पावसाळ्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचेही संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुढील प्रवास योग्य राहिल्यास महाराष्ट्रातही तो लवकर दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

    दरम्यान गुरुवारी मान्सून मालदीव-कोमोरिन भागातील काही भागांत पुढे सरकला असून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व आणि पूर्व-मध्य प्रदेशांत पोहोचला आहे. केरळच्या काही भागांत पावसाळ्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून केरळमधील बर्‍याच भागांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसत आहेत. एर्नाकुलम, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, पठानमथिट्टा आणि जिल्ह्यांमध्ये २४ तासांसाठी पावसाची नोंद करण्यात आली असून तिरुअनंतपुरममध्ये १९ मिमी ते ११५ मिमी दरम्यान पावसाची नोंद करण्यात आली आहे.  आयएमडीने केरळमध्ये मान्सून धडकण्याची घोषणा तेव्हाच करते जेव्हा १० मे नंतर कोणत्याही वेळी सलग दोन दिवस निर्धारित १४ हवामान विभागांवरून २.५ मिमी किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता असल्याच्या सूचना देण्यात येतात. तसेच मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे इतर घटक म्हणजे वारा आणि आऊटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशनचे मूल्य या सर्व घटकांवरून मूल्यमापनही केले जाते.

मार्च-मे दरम्यान देशभरात १५ टक्के पावसाची नोंद

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मार्च ते मे या कालावधीत देशभरात १५ टक्के पाऊस झाला. ईशान्येकडील राज्ये, जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात सध्याच्या मान्सूनपूर्व हंगामात सामान्य किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

९ ते १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात

सध्या मान्सूनच्या आगामी प्रवासासाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे ३१ मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल. त्याप्रमाणे ९ ते १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

COMMENTS