महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास सक्तमजुरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास सक्तमजुरी

अहमदनगर/प्रतिनिधी - पिडीतेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीस दोषी धरून सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्याय

देशहितवादीचे येत्या रविवारी बाळासाहेब थोरातांच्या हस्ते प्रकाशन
देशाला मोदींशिवाय पर्याय नाही ः खा. डॉ. सुजय विखे
जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत ध्रुवला सहा पदके

अहमदनगर/प्रतिनिधी – पिडीतेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीस दोषी धरून सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एम. शेटे यांनी हा निकाल दिला. या आरोपीचे नाव आसीफ कबीर पठाण आहे. तसेच पिडीतेस नुकसान भरपाई म्हणून 30 हजार रुपये दंडाच्या रकमेतून देण्याचा हुकूम झाला आहे.
याबाबतची माहिती अशी कि, पिडीता ही तिच्या बहिणीच्या आजारी मुलाला भेटण्यासाठी पढेगाव येथे जाण्यासाठी बेलापूर रिक्षा स्टॅण्डवर गेली असता तेथे आरोपी आसीफ कबीर पठाण याने जावून तिला खोटे बोलून त्याच्या मोटारसायकलवर बसण्यास भाग पाडून तिला नगर-मनमाड रोडने राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा उजव्या कालव्याजवळील रोडने धरणाच्या दिशेने विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत झाडाझुडपात नेले व तेथे तिला, तुझ्याशी लग्न करायचे असे तो म्हणाला. त्यास तिने नकार दिल्याने आरोपी पठाण याने तिच्यावर सत्तुरने हल्ला केला. पिडीतेच्या गळयावर, छातीवर, दंडावर, कानावर, दोन्ही हाताचे व मनगटावर व इतर ठिकाणी वार करून गंभीर जखमी केले. तसेच पिडीता ही मागासवर्गीय समाजाची असल्याने तिला जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणी राहुरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास करुन आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी व डॉक्टर तसेच तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राक्षे व डी.वाय.एस.पी. राहुल मदने यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या खटल्याची विशेष बाब म्हणजे खटल्याच्या चौकशीचे कामकाज सुरू झाल्यापासून 27 दिवसात खटल्याचा निकाल लागला व आरोपीस शिक्षा झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल डी. ढगे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी डी. डी. ठुबे यांनी सहकार्य केले.

COMMENTS