महाविकास आघाडी तात्पुरती ; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे स्पष्टीकरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडी तात्पुरती ; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे स्पष्टीकरण

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरुपी झालेली नाही. राज्यात पाच वर्षांसाठी तिन्ही पक्षांची आघाडी झालेली आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

देशात पहिल्या फेरीत भरघोस मतदान ! 
अन्यथा सहकार मंत्र्याची शिमगा दिवाळी साजरी करू : आ. सदाभाऊ खोत
आयपीएस देवेन भारतीविरोधात गुन्हा दाखल | LOKNews24

मुंबई / प्रतिनधीः राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरुपी झालेली नाही. राज्यात पाच वर्षांसाठी तिन्ही पक्षांची आघाडी झालेली आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर पटोले यांनी हे विधान केले. केवळ निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा करणार्‍याला अर्थ नाही. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठीच स्वबळ पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हायला हवे, असे ठाकरे म्हणाले होते. याबाबत पटोले यांना विचारण्यात आले असता मुख्यमंत्र्यांनी भाषणातून नेमका कुणाला सल्ला दिला. याची स्पष्टता झालेली नाही, असे म्हटले आहे. काँग्रेससोबत भाजपनेही स्वबळाची नारा दिला आहे. याआधीही भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे यात काहीच गैर नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची पाच वर्षांसाठी निर्मिती झाली. महाविकास आघाडी काही कायमस्वरुपासाठी झालेली नाही. पक्षाची ताकद वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे आणि कोरोना काळात जनतेला मदत करण्याला काँग्रेस पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. मग ते रक्तदान असो, ऑक्सिजन असो किंवा मग प्लाझ्मा; कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठी मदत केली आहे, असे पटोले यांनी सांगितले. ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या नार्‍याबाबत केलेले विधान हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून केले आहे. प्रत्येक पक्षाला मोठे होण्याचा आणि पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.

COMMENTS